आपल्या नृत्याने चाहत्यांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami Patil) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिने आपल्या नृत्याने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. गौतमी पाटीलने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात गौतमी विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेली पाहायला मिळत आहे.
गौतमीने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये ती पालखीचे मनोभावे दर्शन घेताना दिसत आहे. तर दसुऱ्या व्हिडीओमध्ये वारकऱ्यांची सेवा करताना दिसत आहे. तिने वारकऱ्यांना गोड लाडू खाऊ म्हणून दिले आहेत. तसेच व्हिडीओत ती पूजा- आरती करताना दिसत आहे. तिने लहान मुलांसोबत देखील छान वेळ घालवला आहे.
गौतमी तिसऱ्या व्हिडीओमध्ये भजन-कीर्तन करण्यात दंग झालेली पाहायला मिळत आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. प्रेक्षक गौतमीच्या या कृतीने खूपच आनंदी आणि भावुक झाले आहेत. गौतमीचे संस्कृती जपणे नेटकऱ्यांना खूपच आवडले आहे. गौतमीने या व्हिडीओला खूप खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल...राम कृष्ण हरी...माय माऊलींची सेवा..."
व्हिडीओमध्ये गौतमी पाटील निळ्या रंगाच्या सुंदर मराठमोळ्या ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि मनातील भक्तीभाव पाहून सर्वच भारावून गेले आहेत.
गौतमी पाटील नृत्यासोबत छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात देखील सहभागी होते. अलिकडेच ती 'शिट्टी वाजली रे' या कुकिंग शोमध्ये पाहायला मिळाली. तसेच तिच्या 'देवमाणूस' मधील एन्ट्रीने तर चाहते खूपच खुश झाले होते. गौतमी पाटीलचे चाहते आता गौतमीच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.