cultural Department Bonus:  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Cultural Department Bonus: 'चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास'च्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; सरकारकडून इतका बोनस जाहीर

cultural Department Bonus: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान आणि प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

Shruti Vilas Kadam

Cultural Department Bonus: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातील नियमित, कंत्राटी तसेच बाह्ययंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान आणि प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी गुरुवारी केली.

अॅड. शेलार यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांना या निर्णयाची सूचना दिली होती. त्यानुसार म्हसे पाटील यांनी प्रशासनाला तातडीने निर्देश दिले आणि ही योजना सकारात्मकपणे अंमलात आणली.

याप्रमाणे, महामंडळातील नियमित अधिकारी-कर्मचार्यांना सानुग्रह अनुदान १६,८०० रुपये आणि ३०,००० रुपये दिवाळी भत्ता, कंत्राटी आणि बाह्यस्रोत कर्मचारी यांना १५,००० रुपये, तसेच एन.डी. स्टुडीओ मधील कर्मचारी यांना ५,००० रुपये दिवाळीनिमित्ताने दिले जाणार आहेत.

महामंडळात नियमित, कंत्राटी आणि बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचा व्यवसाय विकासात महत्त्वाचा वाटा असल्याने, त्यांचा प्रोत्साहन आणि आर्थिक मदतीद्वारे गौरव करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.या निर्णयामुळे महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, दिवाळी उत्सव अधिक खास आणि प्रेरणादायी होईल असे वाटते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

ED Raid : ईडीची सर्वात मोठी कारवाई; ३५०० कोटींच्या १६० मालमत्ता जप्त, नेमकं काय आहे प्रकरण?

Rice Papad Recipe: पांढरे शुभ्र, खुसखुशीत तांदळाचे पापड कसे बनवायचे?

Pune Politics: राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी, ऐन निवडणुकीच्या काळात पुण्यात मोठी घडामोड

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग' मालिकेत होणार मोठा खुलासा; सुमनने करणार महिपत-नागराजची पोलखोल, पण…

SCROLL FOR NEXT