Box Office Collection: 'कांतारा: चॅप्टर १' ची बॉक्स ऑफिसवर तुफान क्रेझ; ५०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच करणार एन्ट्री

Box Office Collection Report: भारतीय बॉक्स ऑफिसवर सध्या दोन वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट जोरदार सुरु आहेत. ‘कांतारा: चॅप्टर १’ आणि ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’.
Kantara Chapter 1 Box Office Collection
Kantara Chapter 1 SAAM TV
Published On

Box Office Collection Report: दक्षिणेतील प्रतिभावान अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी याचा बहुचर्चित चित्रपट ‘कांतारा चॅप्टर 1’ हा २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. तर रोमँटिक-फॅमिली ड्रामा ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून, पहिल्या दोन आठवड्यांतच त्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

कांतारा चॅप्टर 1’ ने रिलीजच्या १५ व्या दिवशीपर्यंत भारतात तब्बल ४९५ कोटींची कमाई करत विक्रमी यश मिळवले आहे. चित्रपटातील दमदार अभिनय, लोककथांचा अप्रतिम संगम आणि भव्य छायाचित्रण यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट फार आवडला आहे. दक्षिणेत या चित्रपटाची मागणी एवढी वाढली आहे की, अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल शोज लागत आहेत.

Kantara Chapter 1 Box Office Collection
Highest Collection Movie in India: २०२५ मधील आतापर्यंतचे ७ सर्वात मोठे हिट चित्रपट? कोणत्या फिल्मीने केली जास्त कमाई

तर दुसरीकडे, ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटाने आपल्या साध्या पण भावनिक कथानकामुळे उत्तर भारतात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाने फक्त १५ दिवसांतच ५५ कोटींची कमाई केली आहे.

Kantara Chapter 1 Box Office Collection
Diwali 2025 OTT Release: या दिवाळीत OTT वर होणार मोठा धमाका; 'हे' चित्रपट होणार प्रदर्शित

दोन्ही चित्रपटांची एकत्रित कमाई ५५० कोटींच्या घरात पोहोचली असून, आता सगळ्यांच्या नजरा ‘छावा’च्या ८६० कोटींच्या विक्रमी आकड्यावर आहेत. येत्या काही दिवसांत ‘कांतारा चॅप्टर 1’ आणि ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हे दोन्ही चित्रपट मिळून हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com