Shruti Vilas Kadam
अरशद वारसी आणि पंचायत फेम अभिनेता जितेंद्र कुमार यांचा हिंदी क्राईम थ्रिलर 'भागवत अध्याय एक - राक्षस' हा चित्रपट शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५ रोजी झी ५ च्या डिजिटल स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे.
निक आणि नोहाची लव्ह स्टोरी या आगामी चित्रपटात पुढे सरकताना दिसणार आहे.
टायगर श्रॉफ आणि संजय दत्त अभिनीत अॅक्शन-थ्रिलर चित्रपट बागी ४ दिवाळीपूर्वी १७ ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे.
मल्याळम चित्रपट लोका चॅप्टर १: चंद्र २० ऑक्टोबर रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ३०० कोटींची कमाई केली.
शहाना गोस्वामी अभिनीत संतोष चित्रपट ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आला होता. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला उभे राहून कौतुकाचा वर्षाव झाला.हा चित्रपट आता १७ ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म लाँगगेट प्लेवर प्रदर्शित होत आहे.
एलुमाले १७ ऑक्टोबर २०२५ रोजी ZEE5 वर प्रदर्शित होत आहे. हा एक रोमँटिक थ्रिलर आहे.
फायनल डेस्टिनेशन फ्रँचायझीमधील सहावा चित्रपट, फायनल डेस्टिनेशन: ब्लडलाइन्स, १६ ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.