Shruti Vilas Kadam
‘बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना!’ या एका संवादाने हेमा मालिनीचे करिअर अमर झाले. शोले मधील तिची ‘बसंती’ ही उत्साही, बोलकी आणि प्रेमळ मुलगी आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.
या चित्रपटात तिने एकाच वेळी ‘सीता’ आणि ‘गीता’ या भिन्न स्वभावाच्या दोन बहिणींच्या भूमिका साकारल्या. गोड, निरागस सीता आणि खट्याळ, बंडखोर गीता दोन्ही भूमिका तिने अप्रतिम साकारून प्रेक्षकांना दाद द्यायला भाग पाडले.
या चित्रपटानंतरच हेमा मालिनीला “ड्रीम गर्ल” हे बिरुद लाभलं. वेगवेगळ्या रूपांमधून तीने स्त्रीच्या विविध पैलूंचं सुंदर चित्रण केलं आणि ती खऱ्या अर्थाने स्वप्नसुंदरी ठरली.
संत मीरा बाईची भूमिका साकारताना तिने तिच्या अभिनयात अध्यात्म, भक्ती आणि वेदना यांचं मिश्रण साकारलं. हा चित्रपट हेमा मालिनीच्या गंभीर आणि संवेदी अभिनयाचं उत्कृष्ट उदाहरण ठरला.
या चित्रपटात तिने ‘इंदु’ या साध्या पण आत्मविश्वासू स्त्रीची भूमिका निभावली. सात भावांमध्ये शिस्त, प्रेम आणि संवेदना आणणारी ती घरातील आधारवड ठरते.
अमिताभ बच्चनसमवेत बागबान मध्ये तिने समर्पित, प्रेमळ आणि आत्मसन्मान जपणाऱ्या पत्नीची भूमिका साकारली. या भूमिकेने तिला नवीन पिढीतील प्रेक्षकांपर्यंत पोहचवले.
क्लासिक आणि धार्मिक चित्रपटांतूनही तिने स्त्रीशक्तीचं वेगळं रूप दाखवलं. तिच्या अभिनयातून नेहमीच सकारात्मकता, संस्कार आणि शक्तीचा संदेश मिळतो.