Shruti Vilas Kadam
विकी कौशल अभिनीत हा ऐतिहासिक सिनेमा २०२५ मधील सर्वात मोठा हिट ठरला आहे. मराठी आणि हिंदी प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाने चांगली छाप पाडली. अंदाजे ६९३ कोटींची कमाई करून हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ हा भावनिक प्रेमकथा आणि संगीतमय सिनेमा आहे.
अपेक्षा कमी असूनही बॉक्स ऑफिसवर ३५० कोटींची जबरदस्त कमाई करत दुसऱ्या स्थानावर पोहोचला.
आमिर खानच्या या चित्रपटाने पुन्हा एकदा सामाजिक आणि भावनिक विषयांवर प्रकाश टाकला. प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवत हा सिनेमा वर्षातील एक संस्मरणीय चित्रपट ठरला. या चित्रपटाने १९८.८५ कोटी कमावले.
अक्षय कुमारच्या ‘हाउसफुल’ मालिकेचा हा पाचवा भाग प्रेक्षकांनी उत्साहाने स्वीकारला.
हास्य आणि मनोरंजनाचा तडका देत या चित्रपटाने १९५.८० कोटींची मोठी कमाई केली.
अजय देवगणचा थरारक आणि समाजवादी विषय मांडणारा हा सिनेमा हिट ठरला.
पहिल्या भागाप्रमाणेच या सिक्वेललाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटाने ९४.४८ कोटी कमावले.
देशभक्ती आणि ॲक्शनचा मिलाफ असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. अत्याधुनिक व्हिज्युअल्स आणि दमदार कथा हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरले. या चित्रपटाने १५० कोटी कमावले
युद्धावर आधारित या चित्रपटाने पहिल्या भागासारखेच प्रभावी यश मिळवले. प्रेरणादायी कथानक आणि दमदार अभिनयामुळे हा सिनेमा चर्चेत राहिला. या चित्रपटाने ९४.४८ कोटी कमावले.