Smriti - Palash SAAM TV
मनोरंजन बातम्या

Smriti - Palash : स्मृती मानधना अन् पलाश मुच्छलनं इन्स्टाग्राम प्रोफाइलचा Bio बदलला, चाहते पडले गोंधळात

Smriti Mandhana - palash muchhal Change Bio : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे नाते सध्या चांगलेच चर्चेत आहे. अशात त्यांनी सोशल मीडियावरील आपल्या अकाउंटचा Bio बदलला आहे.

Shreya Maskar

स्मृती मानधना अन्  पलाश मुच्छलचे नाते सध्या सोशल मीडियावर चांगले चर्चेत आहे.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलने इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये मोठा बदल केला आहे.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलने इंस्टाग्राम प्रोफाइलचा Bio बदलला आहे.

भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे. स्मृती मानधनाच्या वडीलांना हार्ट अटॅक आल्यामुळे स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले.स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न 23 नोव्हेंबर रोजी होणार होते. दोघांचा लग्न सोहळा सांगली येथे पार पडणार होता. स्मृती मानधनाच्या वडीलांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर काही वेळाने पलाशची तब्येत देखील बिघडली आणि त्याला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अशात आता स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलने इंस्टाग्राम प्रोफाइलचा बायो बदलला आहे. त्यांनी प्रोफाइलमध्ये एका चिन्हाचा समावेश केला आहे. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांनी इंस्टाग्राम प्रोफाइलच्या बायोमध्ये 'नजर' म्हणजे 'इव्हिल आय' (Evil Eye) चा इमोजी टाकला आहे. हा इमोजी वाईट नजरेपासून आपले संरक्षण करण्याचे प्रतिक आहे.

स्मृती आणि पलाश तब्बल 6 वर्ष एकमेकांना डेट करत होते. स्मृतीने लग्नाचे संबंधित सर्व फोटो, पोस्ट सोशल मीडियावरून हटवल्या. त्यानंतर यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी बोल्या जात आहेत. पलाश मुच्छल स्मृती मानधनाला धोका देत असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. सोशल मीडियावर पलाशसोबत एका महिलेचे फ्लर्टी चॅट्स तुफान व्हायरल होत आहेत. हे स्क्रीनशॉट खरे की खोटे याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Smriti Mandhana - palash muchhal

अमिता मुच्छल यांनी सांगितल्यानुसार, स्मृतीच्या वडिलांची तब्येत बरी होत नाही, तोपर्यंत लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय हा पलाशने घेतला. पलाशचे स्मृतीच्या वडीलांशी चांगले नाते आहे. आता स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या नात्याचे पुढे काय होणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

SCROLL FOR NEXT