Zakir Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

Zakir Khan Announces Break From Stage Shows: स्टँड-अप कॉमेडियन झाकीर खान आता स्टेज शो करणार नाही. तब्येतीच्या कारणास्तव त्याने ब्रेक जाहीर केला आहे.

Shruti Vilas Kadam

Zakir Khan Announces Break From Stage Shows: स्टँडअप कॉमेडियन झाकीर खानने शनिवारी जाहीर केले की तो आरोग्याच्या कारणास्तव स्टेज शोमधून ब्रेक घेत आहेत. त्याच्या आरोग्याची काळजी घेत ते आता स्टेज शोसाठी सतत दौरे करणे थांबवत आहेत.

'मी एक वर्षापासून आजारी आहे'

झाकीर खानने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. आरोग्य अपडेट शेअर करताना त्याने लिहिले आहे की, 'मी गेल्या १० वर्षांपासून दौरे करत आहे. तुमचे प्रेम आणि आपुलकी मिळाल्याबद्दल मी खूप भाग्यवान आहे, परंतु इतके दौरे करणे माझ्या आरोग्यासाठी चांगले नाही.

भेटणाऱ्या प्रत्येकाचे समाधान करण्याचा प्रयत्न करणे, दिवसातून २-३ शो, रात्री पुरेशी झोप न मिळणे, सकाळी लवकरची फ्लाईट आणि जेवणाचे बिघडलेले वेळापत्रक. एकूणच, मी एक वर्षापासून आजारी आहे. पण, मला काम करावे लागले, कारण त्यावेळी ते आवश्यक होते. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे'.

'गोष्टी हाताबाहेर जाण्यापूर्वी हाताळल्या पाहिजेत'

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये झाकीरने लिहिले आहे की, 'मला स्टेजवर राहणे आवडते. आता मला कदाचित ब्रेक घ्यावा लागेल. म्हणजे माझा मूड नाहीये, खरंतर मी ते एका वर्षापेक्षा जास्त काळ पुढे ढकलत होतो, पण आता मला वाटतं की परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी मी ती सांभाळली पाहिजे. त्यामुळे, हा भारत दौऱ्यात मर्यादित ठिकाणी असेल. मी अधिक शो करु शकणार नाही कारण मला जास्त वेळ ब्रेक घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका दिवसात डायबेटीस गायब? डायबेटीस मुक्तीची संजीवनी सापडली

Samata Nagari Cooperative Credit Society: राज्यात ३० शाखा, ११०० कोटींच्यावर ठेवी अन् ठेवीदारांचा जीव टांगणीला, समता पतसंस्थेचा नेमका काय आहे प्रकार?

Film Festival: ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लवकरच सुरु; तारीख आली समोर

Maharashtra Live News Update: महाविकास आघाडीमधील पक्षाची पहिली बैठक सोमवारी

New Year Trip : मुंबई-पुणे मुंबई! न्यू इयर ट्रिप होईल खास, स्वस्तात मस्त ठिकाणांची यादी

SCROLL FOR NEXT