Indrayani  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Indrayani : भक्तीला साथ मैत्रीची; 'इंद्रायणी' मालिकेत गणेशोत्सवाचा जल्लोष, पाहा 'गौराई माझी नवसाची'

Indrayani - Gaurai Majhi Navsachi : 'इंद्रायणी' मालिकेत 'गौराई माझी नवसाची' या कार्यक्रमाचा विशेष भाग दाखवण्यात येणार आहे. इंद्रायणीला साथ देण्यासाठी पिंगा गर्ल्स येणार आहेत.

Shreya Maskar

इंद्रायणी आणि पिंगा गर्ल्स एकत्र आले आहेत.

'इंद्रायणी' मालिकेत गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे.

'गौराई माझी नवसाची' हा कार्यक्रम पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत. 'इंद्रायणी' (Indrayani ) मालिकेतही गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. दिग्रसकर वाड्यात यंदाचा गणेशोत्सव खास ठरणार आहे. लग्नानंतरचा पहिला गणपती, त्यात पहिल्यांदाच गौरीचे आगमन होणार आहे. इंद्रायणीसाठी हा उत्सव भावनिक आणि खास दोन्ही आहे. शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून झटणाऱ्या इंद्रायणीने घरात बाप्पा आणि गौराईचं स्वागत करताना 'ज्ञान आणि भक्तीचा संगम' या थीमची निवड केली आहे.

वारकरी पेहरावातील गणराय, सजावटीत दिसणारी शाळा आणि शिक्षणाची प्रतीके हे सगळं एकत्र करून ती संदेश देते की, "ज्ञानाची उपासना हीच खरी भक्ती." गणरायासोबत मोठ्या थाटात गौराईचे आगमन देखील होणार आहे. वाड्यात साजरा होणारा हा जल्लोष अविस्मरणीय ठरणार आहे. पारंपरिक खेळ, लोकप्रिय नायिकांनी त्यांच्या खास आवाजात आणि ठसक्यात सादर केलेली गाणी या सर्वामुळे गणेशोत्सवाची रंगत दुपटीने वाढणार आहे.

पिंगा गर्ल्स देखील "गौराई माझी नवसाची" यात सहभागी होणार आहेत. भैरवी, तेजा, वल्लरी आणि प्रेरणा या सख्या दिग्रसकर वाड्यात पोहचून घरातल्या तणावाला एकदम रंगतदार वळण देणार आहेत. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचा वाड्यातील स्वॅग एन्ट्री प्रेक्षकांना भारावून टाकेल. एकमेकींच्या खांद्याला खांदा लावून त्या इंद्रायणीच्या मेहनतीत, तिच्या स्वप्नात, तिच्या विश्वासात त्या सहभागी होताना दिसणार आहेत. 1000 मोदकांचा नैवेद्य एकटीने करणे इंद्रायणीसाठी मोठं आव्हान आहे. त्यात आनंदीबाई या उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. इंद्रायणीला अडचणीत आणण्याचे प्रयत्न देखील होणार आहेत. पण बाप्पाच्या आशीर्वादाने आणि मैत्रिणींच्या मदतीने 1000 मोदकांचे आव्हान पूर्ण करणार आहे.

कलर्स मराठीवरील नायिका इंद्रायणीसोबत गणराय-गौराईचा उत्सव साजरा करणार आहेत. 'इंद्रायणी' मालिकेच्या विशेष भागात इंद्रायणीच्या सख्यांचा अनोखा जल्लोष पाहायला मिळणार आहे. "गौराई माझी नवसाची" अशी थीम ठरवण्यात आली आहे. हा स्पेशल भाग 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govinda sunita divorce : गोविंदा फक्त माझा आहे, वरून देव आला तरी...; घटस्फोटांच्या चर्चांवर पत्नी सुनीताची प्रतिक्रिया

Maharashtra Live News Update: शिवसेनेचे उपनेते आमदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना.

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : शिवसेनेचे उपनेते आमदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना

Manoj Jarange: पप्पा मुंबईला निघाले, मुलींना अश्रू अनावर, एकीला आली चक्कर; तरीही मनोज जरांगे पुढे निघाले; भावुक VIDEO व्हायरल

रिमझिम पाऊस, ढोल ताशांचा गजर! पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी बाप्पांचे जल्लोषात स्वागत

SCROLL FOR NEXT