Ashok Mama SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ashok Mama : 'अशोक मा.मा.' यांना होणार अटक; मालिकेत धक्कादायक वळण, पाहा VIDEO

Ashok Ma. Ma Serial Update : 'अशोक मा.मा.' मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मामांना पोलीस अटक करणार आहेत. मालिकेत पुढे काय घडणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'अशोक मा.मा.' (Ashok Mama) मालिकेत घरावर संकटाचे सावट घोंघावत आहे. अनिशच्या चुकीमुळे मामांना पोलीस अटक करायला घरात येतात. घरातील सगळ्यांच्या आयुष्यात गोंधळ माजवणाऱ्या अनिशच्या चुकीमुळे अखेर मामांवर संकट कोसळले आहे. अनिश हॉस्पिटलमध्ये पैसे न भरल्याचे तुषारला कळताच तो थेट घरात पोहोचतो. तुषार अनिशविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवतो. अनिशला गुंतवणुकीतून काही पैसे मिळाल्यामुळे तो आणखी अहंकारी होतो. मामांचा त्याच्यावर संशय वाढतो आणि त्यांच्यात मोठा वाद होतो.

'अशोक मा.मा.' मालिकेत अनिशला फसवणुकीच्या प्रकरणात अटक होण्याची वेळ येते, पण पुन्हा एकदा अशोक मामा पुढे येतात. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अशोक मा.मा. सर्व आरोप स्वतःवर घेतात. या घटनेने घरात मोठी खळबळ माजते आणि पोलीस मामांना अटक करतात. तर दुसरीकडे अनिश या सगळ्यामुळे अधिकच गोंधळतो.

'अशोक मा.मा.' मालिकेत वर्षा ताई वेणूची एक जुनी खंत व्यक्त करते. अशोक मामा- त्यांच्या बहिणीमध्ये झालेला वाद मिटावा म्हणून जाताना एक पत्र, काही पैसे ठेवून जाते. त्या पत्रात ती लिहिते की, वेणूकडून काही वर्षांपूर्वी उसने घेतलेले पैसे परत करते. या सर्व प्रसंगांनंतर भैरवी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करते. पण अनिश आत्मविश्वास गमावून बसतो आणि देव-देव करण्यात गुंतून जातो ज्यामुळे त्याचे आणि भैरवीचे नाते आणखी ताणतणावाचे होते.

'अशोक मा.मा.' मालिकेत अनिशच्या फसवणुकीचा पर्दाफाश होणार का? भैरवीच्या बिझनेसवर त्याचा काही परिणाम होणार? अनिशने घातलेला गुंता कसा सुटणार? हे मालिकेत पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'अशोक मा.मा.' मालिका कलर्स मराठीवर रात्री 8.30 वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT