Surabhi Jayashree Jagdish
आजकाल प्रत्येकाला ट्रेनने प्रवास करणं खूप आवडतं. भारतीय रेल्वे हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे.
देशाच्या लोकसंख्येतील एक मोठा हिस्सा दररोज ट्रेनने प्रवास करतो.
या प्रवासासाठी भारतात दररोज अनेक वेगवेगळ्या गाड्या धावत असतात.
अशा वेळी एक प्रश्न सर्वांना पडतो की संपूर्ण ट्रेनची किंमत किती असते?
२४ डब्यांची एक पूर्ण ट्रेन साधारणपणे ६० ते ७० कोटी रुपयांची येते.
एखाद्या ट्रेनची किंमत तिच्या प्रकारावर आणि डब्यांच्या संख्येवर अवलंबून असते.
२० डब्यांची एक MEMU साधी गाडी सुमारे ३० कोटी रुपयांची असते.
कालका मेलसारखी २५ डब्यांची ICF प्रकारातील ट्रेनची किंमत ४०.३ कोटी रुपये आहे.