CM Fadnavis On Pranit More Saam Tv
मनोरंजन बातम्या

CM Fadnavis On Pranit More: मी पण स्टँडअप कॉमेडी पाहतो पण...; प्रणित मोरेच्या ३७० बिर्याणी वादावरुन मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

CM Devendra Fadnavis On Pranit More Stand Up Comedy Show: प्रणित मोरे शोतील वादग्रस्त व्हिडिओंवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया दिली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Shruti Vilas Kadam

CM Devendra Fadnavis On Pranit More Stand Up Comedy Show: स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमधील वादग्रस्त वक्तव्यांवरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘370 रुपयांची बिर्याणी’ या वक्तव्याबरोबरच एका डॉक्टर तरुणीने मृतदेहांच्या खासगी अवयवांबाबत केलेल्या आक्षेपार्ह कमेंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या प्रकरणामुळे प्रणित मोरे, हिमांशू जांगडा आणि डॉ. सेजल पवार हे तिघेही चर्चेत आले असून त्यांच्यावर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे.

आता या संपूर्ण वादावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार सर्वांना असल्याचे मान्य केले. मात्र, हे स्वातंत्र्य स्वैराचारात बदलता कामा नये, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री म्हणाले की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. स्टँडअप कॉमेडियनलाही तो अधिकार आहे. मात्र, सामाजिक मर्यादा ओलांडून केलेली अभिव्यक्ती इतरांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवू शकतो.

त्यामुळे मनोरंजन करताना देखील काही मर्यादा पाळणे आवश्यक आहे. समाजातील कोणाच्याही सन्मानाला धक्का लागणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्टँडअप कॉमेडी सगळ्यांनाचं आवडते. मी पण स्टँडअप कॉमेडी पाहतो पण आपली प्रतिष्ठा राखलीचं गेली पाहिजे. असा सूचक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

दरम्यान, या प्रकरणात महाराष्ट्र सायबर विभागानेही कारवाई सुरू केली आहे. सोशल मीडिया आणि विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह सामग्री प्रसारित केल्याप्रकरणी प्रणित मोरे, हिमांशू जांगडा, डॉ. सेजल पवार आणि इतर संबंधितांविरोधात ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ (BNS) आणि ‘माहिती तंत्रज्ञान कायदा २०००’ (IT Act), BNS कलमे ७५(१)(iv), ७५(३), २९४, आणि ३५३(२) आणि IT Act कलम ६७६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT