CID  SAAM TV
मनोरंजन बातम्या

दया दरवाजा तोड दो! आठ वर्षांनी CID ची पुन्हा धमाकेदार एन्ट्री, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

CID Teaser: सीआयडी आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहत होते.

Shreya Maskar

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडता शो सीआयडी (CID) आता पुन्हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे. यामुळे सीआयडीच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. सीआयडी तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. सीआयडीचा दुसरा सीझन 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सीआयडीच्या टीझरमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुरुवातीला दयानंद शेट्टीचे डोळे दिसत आहेत. शिवाजी साटम मुसळधार पावसात क्राइम स्पॉटवर येताना दिसत आहे. तर आदित्य श्रीवास्तवचे रक्ताने माखलेले डोळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. टीझरच्या शेवटी टाइम बॉम्बचा आवाज ऐकायला मिळत आहे. सीआयडीचे हे सीझन कोणत्या ट्विस्टने भरलेले आहे हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सीआयडीचा धमाकेदार प्रोमो आज (26 ऑक्टोबर) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.सीआयडीच्या या टीझरवर प्रेक्षकांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. आता सीआयडीच्या दुसऱ्या सीझनमध्ये एसीपी प्रद्युमन, सीनियर इन्स्पेक्टर अभिजीत, सीनियर इन्स्पेक्टर दया व्यतिरिक्त कोणते कलाकार पाहायला मिळतील याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सीआयडीने 20 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर 2018 मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. सीआडीच्या पात्रांना प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं. कुछ तो गडबड हैं, दया तोड दो दरवाजा हे डॉयलॉग आजही लोकांच्य आवडीचे आहेत.

या क्राइम इन्व्हेस्टिकेशन शोची चाहत्यांना चांगलीच भुरळ पडली होती. एसीपी प्रद्युमन, सीनियर इन्स्पेक्टर अभिजीत, सीनियर इन्स्पेक्टर दयासोबतच डॉक्टर साळुंखे, डॉक्टर तारिका, इन्स्पेक्टर श्रेया, इन्स्पेक्टर पूर्वी, इन्स्पेक्टर पंकज असे अनेक कलाकार या शोमध्ये पाहायला मिळाले. दिवंगत अभिनेते दिनेश फडणीस यांनी सीआयडीमध्ये इन्स्पेक्टर फ्रेडरिक्सची भूमिका साकारली होती. हे सर्वाचे आवडते पात्र होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

SCROLL FOR NEXT