Myra Vaikul Serial Promo Instagram/ @_world_of_myra_official
मनोरंजन बातम्या

Myra Vaikul Serial Promo: छोट्याशा परीचा थाटच न्यारा; मायराच्या लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष...

मायरा लवकरच ‘नीरजा- एक नई पहचान’ या हिंदी सीरियलमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Myra Vaikul New Serial Teaser: टेलिव्हिजन सीरियल हा प्रेक्षकांच्या अगदीच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. टेलिव्हिजनवरील कलाकारांचं आणि प्रेक्षकांच एक वेगळं नातं निर्माण होत आहे. प्रेक्षकांना नेहमीच आवडणारी, आपल्या अभिनयाने सर्वांनाच आपलंसं करणारी मायरा लवकरच ‘नीरजा- एक नई पहचान’ या हिंदी सीरियलमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिने आपल्या अभिनयातून सर्वांनाच आपलंसं केलं आहे.

लवकरच मायरा कलर्सवरील ‘नीरजा- एक नई पहचान’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मायरासोबत बिग बॉस मराठी २ फेम स्नेहा वाघ तिच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघींच्याही जोडीने मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळेल. नुकताच या मालिकेचा दुसरा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये मायराच्या लूकने सर्वांचंच लक्ष वेधले.

मायराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मालिकेचा आणखी एक नवा प्रोमो शेअर केला आहे, त्यातील तिच्या लूकने सर्वांचेच मन जिंकले. शेअर केलेल्या टीझरमध्ये, मायरानं बंगाली पद्धतीची साडी नेसून कालीमातेची आरती करताना दिसत आहे, दरम्यान तिच्यावर एक व्यक्ती नजर ठेवत असल्याचं तिला कळतं आणि ती बंगालीमध्ये एक ते दहा अंक बोलते. दहा पर्यंत आकडे बोलते आणि ती लगेच घरी पळ काढते.

त्याठिकाणी परी भेटलेल्या एका महिलेला म्हणते, “माझ्या आईने मला सांगितलं, दहा अंक पूर्ण होईपर्यंत जर एखादी व्यक्ती आपल्याकडे बघत असेल तर तिथून पळून जायचं.” त्यावर ती बाई मायराला म्हणते, “आमची नीरजा इतकी सुंदर दिसते तर लोकं तिच्याकडे बघणारच ना.” एवढ्यात नीरजाची आई (स्नेहा वाघ) तिकडे येते आणि तिला घेऊन जाते. आपल्या चिमुकलीला अर्थात नीरजाला कुठल्याही कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागू नये, म्हणून तिची आई मायराचे केस कापते, असं त्या प्रोमोमध्ये दिसतंय.

सध्या मायराचा हा नवा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तिच्या अभिनयाची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. मायराच्या अनेक चाहत्यांनी तिचं, अभिनयाचं, बंगाली भाषेवरील प्रभुत्व या सर्वांचं कौतुक सध्या तिचे चाहते करीत आहेत. मराठमोळी मायराची ही हिंदी टेलिव्हिजनवरील पहिली मालिका असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मायरा यापूर्वी सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटर म्हणून प्रसिद्ध तर होतीच, पण त्यासोबत ती ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या माध्यमातून ती टेलिव्हिजनवरील बालकलाकार म्हणून देखील प्रसिद्धीस आली. सध्या मायरा ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये बालकलाकार म्हणून देखील दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Viral Video : मुलीला शाळेत सोडताना अचानक आला पाऊस, चिमुकली भिजू नये यासाठी आईनं जे केलं ते पाहून कराल कौतुक; पाहा VIDEO

Mahakumbh Monalisa: करोडोंचे हिरे, आलिशान गाडी, महागडे कपडे महाकुंभाच्या मोनालिसाचा स्टेटस बघून व्हाल थक्क

Marathi Serial: अभिनेत्री समृद्धी केळकर दिसणार या मराठी मालिकेत

Badnapur News : नागरी सुविधा नसल्याने ग्रामस्थ संतप्त; सरपंचासह ग्रामसेवकाला कोंडले ग्रामपंचायत कार्यालयात

SCROLL FOR NEXT