Saisha Bhoir's Arrested In Fraud Case: सोशल मीडिया स्टार आणि बालकलाकार साईशा भोईरच्या आईला अटक करण्यात आली आहे. साईशाच्या आईने फसवणूक केल्याने तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चला जाणून घेऊन काय आहे संपूर्ण प्रकरण.
काय आहे नेमकं प्रकरण?
कुलाबा इथं राहणाऱ्या एका दाम्पत्याला पूजा भोईर हिनं तिच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितलं. त्यांनी गुंतवणूक केल्यानंतर मात्र परताना देण्याची वेळ आली तेव्हा, आकडता हात घेतला. या दाम्पत्याला तब्बल १६ लाखांना गंडा घातल्याचा आरोप पूजा भोईर हिच्यावर करण्यात आलाय. (Latest Entertainment New)
हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पूजा भोईर हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पूजा कदम- भोईर हिला कफ परेड पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समोर आलं . आरोपी पूजा भोईर हिला काल अटक करण्यात आली आहे. 'ती सध्या पोलिस कोठडीत आहे," असं वरिष्ठ पीआय राजेंद्र रणमाळे यांनी सांगितलं आहे.
साईशाच्या आईला अटक झाल्यामुळे साईशाच्या मालिकेतील करियरवर परिणाम होणार का अशी शक्य वर्तवली जात आहे. लहान वयात साईशासाठी आईला अटक होणं ही फार मोठी घटना आहे.
साईशा सध्या नवा गडी नवं राज्य मालिकेत अभिनय करतेय. साईशाच्या कामावर या गोष्टीचा कोणताही परिणाम होणार नाही.
सेटवर तिच्याशी याबाबत बोलणे टाळलं जात आहे. तिच्या शुटिंगवर या घटनेचा कोणताही परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.