Sonia Balani Threats: धक्कादायक; ‘द केरला स्टोरी’मधील असिफाला जीवे मारण्याची धमकी

‘द केरला स्टोरी’ चित्रपटात असिफाची भूमिका साकारणाऱ्या सोनिया बलानीला जीवे मारण्याची धमकी सध्या मिळत आहे.
Sonia Balani Threats
Sonia Balani Threats Saam Tv

Sonia Balani Receiving Threats: ‘द केरला स्टोरी’ चित्रपटात असिफाची भूमिका साकारणाऱ्या सोनिया बालानीला (Sonia Balani) ला जीवे मारण्याची धमकी सध्या मिळत आहे. सोनियाला कोणी जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे, तर कोणी अर्वाच्य भाषेत बोलत धमकी मिळाली आहे. बळजबरीने धर्मांतरित झालेल्या सुमारे 7,000 मुलींना भेटल्याची माहिती सोनियाने दिली. सध्या या धर्मांतरित मुली आश्रमात राहत आहेत. चित्रपट आधारित असलेल्या विषयावर सध्या ती खुलेपणाने बोलत असल्याने तिला धमक्या मिळत असल्याची माहिती तिने दिली. या गोष्टी तिच्यासाठी काही नवीन नसून यापूर्वी अशा भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना धमक्या येत असल्याचे तिने बोलताना नमूद केले.

Sonia Balani Threats
Bharat Jadhav Big Announcement: रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही... भरत जाधव यांनी केली घोषणा

पश्चिम बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घालण्याच्या प्रश्नावर सोनिया म्हणते, हे चुकीचे आहे. चित्रपटावर बंदी घालू नये. यापूर्वीही अशी भूमिका साकारणाऱ्या अनेक कलाकारांना धमक्या येत होत्या. सोनिया मूळची उत्तर प्रदेशातील आग्रा येथील रहिवासी. आग्र्यातील झुलेलेलाल भवन येथे सोनिया, तिचे वडील रमेश बलानी आणि कुटुंबीयांनी यावेळी माध्यमांसोबत संपर्क साधला.

माध्यमांसोबत बोलताना सोनिया म्हणते, “मी स्वतः पीडित मुलींना भेटली आहे. त्यांच्या व्यथा यावेळी मी ऐकून घेतल्या. मुलींच्या व्यथा ऐकून मला खूपच वाईट वाटलं. या मुलींची गोष्ट प्रत्येका पर्यंत पोहोचवायची होती, म्हणून मी ‘द केरला स्टोरी’मध्ये असिफाची व्यक्तिरेखा साकारण्याचा निर्णय घेतला. यावेळी मी असिफाचे पात्र साकरातना प्रामाणिकपणे तिची व्यथा समजत साकरले. मी माझ्या रियल लाईफमध्ये या पात्राच्या पुर्णपणे विरोधात आहे. सिनेकारकिर्दित पदार्पण केले त्यावेळी निगेटिव्ह पात्र साकारायचे नाही, अशी मनात ठाम भूमिका ठेवली होती. पण मला अशा आव्हानात्मक भूमिका साकारायला फार आवडते.”

Sonia Balani Threats
Sushant Shelar Chitrapat Sena Chief: सुशांत शेलार सांभाळणार शिवसेनेच्या चित्रपट सेनेची कमान; मुख्यामंत्री एकनाथ शिंदेंनी केली नियुक्ती

यावेळी पत्रकारांनी सोनियाला चित्रपटाचा सिक्वेल येणार का असा प्रश्न विचारला, यावर सोनिया म्हणते, “मला याबद्दल काहीच माहिती नाही. या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता प्रेक्षकांच्या पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून प्रेक्षक आता चित्रपटातील सेलिब्रिटींना पाहायला जात नाही तर, त्यातील आशय- विषय कसा आहे, याचा विचार करूनच चित्रपटाला प्राधान्य देतात. त्यामुळेच ‘द केरला स्टोरी’ला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. अनेक मुस्लिम मुलींना या चित्रपटाची कथा भावली असून त्यांनी सोनियाकडे तिच्या अभिनयाचे कौतुक केले.”

सोबतच यावेळी सोनियाने बाहेर शिकणाऱ्या विद्यार्थिनींना आणि त्यांच्या पालकांना आवाहन केले की, बाहेर शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी तसेच त्यांच्या पालकांनी त्यांच्या रूममेट्स आणि वर्गमित्रांची संपूर्ण माहिती घ्यावी, कोणाच्याही फसवणुकीत अडकू नये, असे आवाहन सोनियाने केले. पालकांनीही मुलांवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे, असं सोनियाने आपले मत मांडले. भविष्यातही सोनियाला अशाच आव्हानात्मक भूमिका साकारयच्या आहेत.

सोनियाच्या कामाबद्दल बोलायचे तर, सोनिया बालानी आग्र्यातील रहिवासी आहे. चित्रपटात काम करण्यापूर्वी तिने टेलिव्हिजनसृष्टीत काम केले आहे. ती 'डिटेक्टिव दीदी', 'तू मेरा हिरो' आणि 'बडे अच्छे लगते हैं' या सारख्या टेलिव्हिजन शोमध्ये दिसली होती. नुकतीच सोनिया ‘द केरला स्टोरी’ मुळे चर्चेत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com