Chhatrapati Sambhaji Maharaj rap google
मनोरंजन बातम्या

Maza Shambhu Raja Rap Song : छत्रपती संभाजी महाराजांची गाथा आता 'शंभू राजा' रॅपमधून नव्या अंदाजात, संगीतकार ब्रम्हाचा अनोखा प्रयोग

Chhatrapati Sambhaji Maharaj History Song : शंभू राजा रॅप गाण्यातून संभाजी महाराजांचा पराक्रम आधुनिक शैलीत मांडला आहे. ब्रम्हा यांचे संगीत, सुनिल गोडबोले आणि बालकलाकारांचा अभिनय गाण्याला प्रेरणादायी बनवतो.

Sakshi Sunil Jadhav

छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आत्तापर्यंत अनेक चित्रपट गाणी आली आहेत. बदलत्या स्टाईलनुसार आता त्यांचा इतिहास एका रॅप सॉंग मधून उलघडणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित एक आगळावेगळा ऐतिहासिक रॅप साँग 'शंभू राजा' हे नुकतंच प्रदर्शित झालं असून, या गाण्याने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. इतकंच नाहीतर अल्पावधीतच हे गाणं रसिकांच्या मनावर राज्य करत आहे.

आधुनिक रॅपच्या माध्यमातून इतिहास मांडण्याचा हा अनोखा प्रयत्न मानला जात आहे. या गाण्याचे संगीत दिग्दर्शन ब्रम्हा यांनी केले आहे. त्यांच्या सर्जनशील दिग्दर्शनामुळे पारंपरिक इतिहास आणि आधुनिक संगीत यांचा सुंदर संगम या गाण्यांत साधला गेला आहे. विशेष म्हणजे, या रॅप साँगमध्ये लहान मुलांचा अभिनय पाहायला मिळतो, ज्यामुळे गाण्याला एक वेगळीच भावनिक आणि शैक्षणिक छटा लाभली आहे.

या गाण्यात अभिनेते सुनील गोडबोले यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांनी आपल्या प्रभावी अभिनयातून लहान मुलांना छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि विचारांची ओळख करून दिली आहे. त्यांच्या संवादातून मुलांना इतिहासाची प्रेरणा मिळताना दिसते. छत्रपती संभाजी महाराजांचे धैर्य, बुद्धिमत्ता आणि स्वराज्यासाठी केलेले बलिदान यांचे प्रभावी चित्रण या गाण्यात करण्यात आले आहे. रॅपच्या तालावर सादर झालेला हा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक अभिनव प्रयत्न या चिमुकल्यांनी केला आहे.

'ब्रम्हा ऑफिशिअल' प्रस्तुत 'शंभू राजा' हे गाणं संगीत दिग्दर्शक ब्रम्हा यांचे आहे. गाण्याचे बोल हे ब्रम्हा आणि ओंकार राज यांनी लिहीले आहेत. तर या गाण्याच्या व्हिडीओचे दिग्दर्शन मनीष महाजन यांचे आहे. अभिनेते सुनील गोडबोले आणि बालकलाकार अद्विका सातपुते यांच्या मुख्य भूमिका गाण्यात पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT