Vicky-Rashmika SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vicky-Rashmika : 'छावा' रिलीजपूर्वी विकी-रश्मिका साईबाबांच्या दर्शनाला, पाहा VIDEO

Vicky-Rashmika shirdi Visit : 'छावा' चित्रपटाचे स्टार अभिनेता विकी कौशल आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदानाने शिर्डीत साईबाबांच्या मंदिराला भेट दिली आहे. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Shreya Maskar

'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर आहेत. 'छावा' (chhaava ) चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि महाराणी येसूबाईंची भूमिकेत रश्मिका मंदाना पाहायला मिळणार आहेत. 'छावा' च्या ट्रेलरला आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

विकी-रश्मिका शिर्डी भेट

'छावा' रिलीज होण्यासाठी आता फक्त एक दिवस उरला आहे. या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये वाढत जात आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) चित्रपटाचे खूप तगडे प्रमोशन केले आहे. तसेच विकी आणि रश्मिका अनेक धार्मिक ठिकाणांना भेट सुद्धा दिली आहे. विकी कौशलने याआधी घृष्णेश्वरच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते. आता विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना शिर्डीत पोहचले आहेत.

नुकतेच विकी आणि रश्मिकाने साईबाबांचे दर्शन घेतले आहे. दर्शनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये विकी आणि रश्मिका साईबाबांचे आशीर्वाद घेताना पाहायला मिळत आहेत. चित्रपटाच्या रिलीजपूर्वी 'छावा'ची टीम सकारात्मक वातावरण निर्माण करत आहे. व्हिडीओमध्ये विकी रश्मिकाला दर्शना बद्दल सांगताना दिसत आहे. विकी रश्मिकाच्या जोडीला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे.

'छावा' चित्रपटात औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. 'छावा' चित्रपटात अनेक मराठी कलाकार पाहायला मिळणार आहेत. 'छावा' चित्रपटासाठी विकी कौशलने खूप मेहनत घेतली आहे. चित्रपटासाठी विकी कौशलने तब्बल 25 किलो वजन वाढवले. तर घोडेस्वारी देखील शिकली. कठोर परिश्रमानंतर सात महिने विकीने आपले शरीर सिंहासारखे बनवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking Loss Calories: रोज फक्त २० मिनिटं चालण्याने किती कॅलरी बर्न होतात? वजन कमी करणाऱ्यांनी जाणून घ्या!

Maharashtra News Live Update: वसई पूर्वेत उघड्या गटारात पडून दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू

Moringa Leaves : शेवग्याची पाने रोज खाल्ल्याने काय होते? फायदे वाचून व्हाल थक्क, बनवा 'या' ७ खास रेसिपीज

Driverless Metro : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पहिल्यांदाच धावणार ड्रायव्हरलेस मेट्रो; मार्ग आणि स्थानके कोणती?

India Post Bonus : रेल्वेनंतर आता पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! ६० दिवसांच्या वेतनाइतका बोनस जाहीर

SCROLL FOR NEXT