Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाला दुसरा मोठा दणका, फॉलोअर्सचं प्रेम घटलं

Fans Unfollow Ranveer Allahbadia : सध्या तुफान चर्चेत असलेला रणवीर अलाहाबादियाला त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. त्याच्या फॉलोअर्सच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे.
Fans Unfollow Ranveer Allahbadia
Ranveer AllahbadiaSAAM TV
Published On

युट्यूबर रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) सध्या त्याच्या वक्तव्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. रणवीर अलाहाबादियाने 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये पालकांवर एक अश्लील वक्तव्य केल्यामुळे त्याला नेटकऱ्यांकडून चांगलेच ट्रोल केले जात आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सर्व बाजूंनी त्यांच्यावर टीका होताना पाहायला मिळत आहे. रणवीर अलाहाबादियाचे चाहते तर त्याच्यावर प्रचंड भडकलेले पाहायला मिळत आहेत.

रणवीरच्या या प्रकरणाबाबत त्याच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. रणवीर अलाहाबादिया हा एक युट्यूबर असल्यामुळे त्याच्यासाठी चाहत्यांचे प्रेम खूप महत्त्वाचे तसेच गरजेचे आहे. मात्र आता याप्रकरणामुळे त्याच्या चाहत्यांच्या संख्येत झपाट्याने घट होताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर त्याच्या विषयी नकारात्मक बोले जात आहे. त्याने आपल्या चाहत्यांना खूप दुखावले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, आता रणवीर अलाहाबादियाच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या संख्येत झपाट्याने घट होताना पाहायला मिळत आहे. त्याचे फॉलोअर्स कमी होत आहे. रणवीर अलाहाबादियाचे इंस्टाग्रामवर दोन अकाऊंट आहे. एका अकाऊंटचे नाव रणवीर अलाहाबादिया तर दुसऱ्या अकाऊंटचे नाव बिअर बायसेप्स असे आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रणवीर अलाहाबादियाच्या अकाऊंटचे जवळपास 4 हजार 153 फॉलोवर्स कमी झाले आहेत. तर बिअर बायसेप्स या अकाऊंटवरील 4 हजार 205 चाहत्यांनी त्याला अनफॉलो केले आहे.

सध्या रणवीर अलाहाबादियाच्या इंस्टाग्राम अकाऊंटचे 3.4 मिलियन फॉलोवर्स आहेत. तर बिअर बायसेप्स या त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 4.4 मिलियन फॉलोवर्स आहेत. सध्या सर्वत्र रणवीर अलाहाबादियाला नकारात्मक भावनांना सामोरे जावे लागत आहे. याप्रकरणात रणवीर अलाहाबादियाने चाहत्यांची माफी देखील मागितली आहे. मात्र चाहते अजूनही त्याच्यावर नाराज असल्याचे दिसून येत आहेत.

Fans Unfollow Ranveer Allahbadia
Devmanus : 'देवमाणूस' मधील महेश मांजरेकर यांचा लूक पाहिलात का? चित्रपटासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com