Aastad kale On Chhaava Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aastad Kale: 'छावा वाईट फिल्म...'; आधी चित्रपटात काम, मग त्यावर टीका, नंतर पोस्ट डिलीट, आस्तादच्या स्टंटमुळे चाहते संतप्त

Aastad Kale On Chhaava : मराठी अभिनेता आस्ताद काळेने नुकताच ‘छावा’ या चित्रपटाविषयी परखड मत व्यक्त केलं असून त्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Shruti Kadam

Aastad Kale: मराठी अभिनेता आस्ताद काळेने नुकताच ‘छावा’ या चित्रपटाविषयी परखड मत व्यक्त केलं असून त्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस यश मिळवले असले तरी आस्तादने मात्र या चित्रपटावर गंभीर टीका केली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात आस्तादने स्वतःही भूमिका साकारली आहे. तरीही त्याने स्पष्टपणे सांगितले की, हा चित्रपट त्याला अजिबात आवडलेला नाही.

आस्तादने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, "मी चित्रपट पाहिला आणि माझ्या भावना रोखू शकलो नाही. हा कुठला इतिहास दाखवला आहे? या चित्रपटाचा इतिहासाशी काहीही संबंध नाही. ही एक अत्यंत वाईट फिल्म आहे." त्याच्या या विधानामुळे सिनेसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये खळबळ माजली आहे. त्याच्या या विधानामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामध्ये आता ही पोस्ट करायची काय गरज या प्रकारचे प्रश्न चाहते विचारत आहेत.

छावा’ चित्रपटाने जरी तिकीट खिडकीवर यश मिळवलं असलं तरी त्यात ऐतिहासिक अचूकतेचा अभाव आहे, अशी टीका आस्तादने केली आहे. तो म्हणतो, "इतिहास म्हणजे केवळ भावनिक खेळ नव्हे, त्यामागे तथ्य असावं लागतं." प्रेक्षकांना भावनिक स्तरावर भिडणं हे महत्त्वाचं असलं, तरी इतिहासाचे विकृतीकरण हा गंभीर मुद्दा असल्याचे तो सूचित करतो.

aastad kale post

त्याच्या या भूमिकेमुळे सोशल मीडियावर अनेकांनी त्याचे समर्थन केले, तर काहींनी त्याच्यावर टीकाही केली. मात्र आस्ताद आपल्याच भूमिकेवर ठाम असून त्याने शेवटी लिहिलं, "जे सत्य आहे, ते सांगणं गरजेचं आहे, मग ते कुणालाही त्रासदायक का ठरू नये." या सडेतोड भूमिकेमुळे आस्ताद काळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या चर्चेची सुरुवात केल्यानंतर मात्र आस्तादने त्याच्या फेसबुकवर या पाचही पोस्ट दिलीत केल्या आहेत. त्यामुळे नेटकरी त्याच्यावर संतप्त झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

SCROLL FOR NEXT