Chhaava Box Office Collection  SaamTv
मनोरंजन बातम्या

Chhaava Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची हवा, छावाच्या गर्जनेनं बॉक्स ऑफिस हादरलं, विकीच्या छावाचा नवा विक्रम

Chhaava Box Office Collection : छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित छावाच्या गर्जनेने बॉक्स ऑफिस हादरुन गेलंय. अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचा नवा उच्चांक गाठलाय.

Bharat Mohalkar

मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.. छावा चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमवलाय? छावा चित्रपट कोणत्या कारणांमुळे हिट ठरलाय? यावरचा हा विशेष रिपोर्ट.

छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित छावाच्या गर्जनेने बॉक्स ऑफिस हादरुन गेलंय. अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचा नवा उच्चांक गाठलाय. अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची तर रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय. छावा चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत ३१ कोटींचा गल्ला जमवलाय. छावाच्या यशाची कारणं काय आहेत? पाहूयात.

विकी कौशलच्या दर्जेदार अभिनयाची प्रेक्षकांना भूरळ

लक्ष्मण उतेकर यांचं उत्कृष्ट दिग्दर्शन

जोरदार प्रमोशन्स आणि अॅडव्हान्स बुकिंग

छावा चित्रपटाला ओपनिंगलाच प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. १३० कोटी खर्च करुन दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांनी शिवाजी सावंतांच्या छावा कादंबरीवर आधारित छावा चित्रपट बनवला. छावाच्या ५ लाख तिकीटांच्या अॅडव्हान्स बुकिंगमधूनच १३ कोटी ७० लाखांची कमाई झाली. एवढंच नाही तर छावा चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३१ कोटी रुपयांची कमाई केलीय. त्यामुळे प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारा छावा पहिल्याच आठवड्यात आपल्या कमाईनं १०० कोटीच्या क्लबमध्ये जाण्याची शक्यता अधिक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT