Chhaava Movie Box Office Collection: विकीच्या 'छावा'चा बॉक्स ऑफिसवर डंका; पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई; आकडा वाचून डोळे फिरतील

Chhaava Movie: अभिनेता विकी कौशलचा बहुप्रतिक्षित चित्रपट छावा हा १४ फेब्रुवारीला चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे हे जाणून घेऊया.
Chhaava Cinema
Chhaava Cinemasaam tv
Published On

अभिनेता विकी कौशलचा बहुप्रतिक्षित चित्रपट छावा १४ फेब्रुवारीला चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. संभाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे? हे जाणून घेऊया.

Chhaava Cinema
Chhaava Box Office collection: बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची हवा; मोडले रेकॉर्ड, पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

ट्रेड रिपोर्टनुसार, छावा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचा मोठा उच्चांक गाठला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ३१ कोटी रूपयांची दमदार कमाई केली आहे. मोठ्या संख्येने या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्येच ५ लाख तिकीट बुक झाले होते. यामध्ये १३. ७० कोटींची कमाई झाली होती. छावा हा चित्रपट १३० कोटींचा बिग बजेट चित्रपट आहे. चित्रपट निर्मात्याकडून चित्रपटांविषयी मोठ्या अपेक्षा असल्याने चित्रपट यशस्वी ठरणार असल्याचे पहिल्या दिवशीच्या कमाईवरून दिसत आहे.

Chhaava Cinema
Salman Khan: सिकंदरनंतर सलमान खानचा 'हा' चित्रपट येणार भेटीला; ११ वर्षांनंतर करणार ब्लॉकबस्टरचा सिक्वल

छावा हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. चित्रपटात विकी कौशलने संभाजी महाराजांची महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईची भूमिका साकारली आहे. त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षक भारावून गेले आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक विकीच्या भूमिकेचे कौतुक करत आहे. याशिवाय या चित्रपटात अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, डायना पेटी यांच्या भूमिका आहेत.

Chhaava Cinema
Baipan Bhari Deva Re -release: सात बहिणी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'बाईपण भारी देवा' ठरला री-रिलीज होणारा पहिला मराठी चित्रपट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com