Baipan Bhari Deva Re -release: सात बहिणी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'बाईपण भारी देवा' ठरला री-रिलीज होणारा पहिला मराठी चित्रपट

Baipan Bhari Deva Re -release : 'बाईपण भारी देवा' प्रदर्शित होऊन आता अनेक दिवस लोटले तरी प्रेक्षकांना हा चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा पाहण्याची इच्छा आहे म्हणूनच निर्मात्यांनी पुनः रिलीजची घोषणा केली आहे.
Baipan Bhari deva Re-release
Baipan Bhari deva Re-releaseSaam Tv
Published On

Baipan Bhari Deva Re -release: केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओज प्रस्तुत मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाईपण भारी देवा पुन्हा सिनेमागृहांत रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट, आतंरराष्ट्रीय महिला दिना निमित्त म्हणजेच ७ मार्च पासून आपल्या सख्यांना भेटायला येत आहे.

२०२३ मध्ये रिलीज होताच या चित्रपटानं पहिल्या आठवड्यातच बाजी मारत १२.५ कोटींचा गल्ला जमवला होता. इतकंच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एका दिवसांत ६.१० कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता.  बाईपण भारी देवा चं एकूण कलेक्शन हे तब्बल ७६.५ कोटींचं होतं, तर सगळ्यात जास्त कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे. प्रदर्शनानंतर यानं नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेतच त्यात अजून एक भर म्हणजे मराठी सिनेसृष्टीत पुन्हा रिलीज होणारा सध्याच्या काळातील हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

Baipan Bhari deva Re-release
Vicky-Katrina: 'तिने मला समजून घेत...'; विकी कौशलने केले पत्नी कतरिना कैफचे कौतुक, व्हिडीओ व्हायरल

'बाईपण भारी देवा' प्रदर्शित होऊन आता अनेक दिवस लोटले तरी देखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नाही. अजूनही थिएटर्समध्ये चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण उत्सुक दिसतात आहेत.

Baipan Bhari deva Re-release
Chhaava Movie Box Office: विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटची रेकॉर्ड-ब्रेक ओपनिंग; ॲडव्हान्स बुकिंगमध्येच केली कोट्यवधींची कमाई

आणि यातील अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे आज प्रदर्शित होत असलेल्या ‘छावा‘ या चित्रपटा बरोबर ‘बाईपण भारी देवा‘ चा ट्रेलर दिसणार आहे. आणि म्हणूनच आज निर्मात्यांनी आपल्या सोशल मिडियावर चित्रपट पुनः रिलीज करणार असल्याची घोषणा केली आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की, "बाईपण भारी देवा' हा नेहमीच माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे. मायबाप प्रेक्षकांनी आमच्या संपूर्ण टीमवर केलेला प्रेमाचा वर्षाव, आमच्या कष्टाला दिलेली दाद, तो अनुभव खूपच स्पेशल आहे. जिओ स्टुडिओजच्या सहयोगाने आता पुनः तो उत्सव सिनेमागृहांत अनुभवता येणार आहे. महिला दिनाच्या निमित्त पुन्हा प्रेक्षक आवर्जुन सिनेमागृहांत आपल्या सख्यांना घेऊन जातील. ज्यांनी आधी चित्रपट नाही पाहिलाय ते नवीन प्रेक्षक ही मनोरंजनाच्या या उत्सवात सामिल होतील अशी मला खात्री आहे".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com