
Salman Khan: बॉलीवूडचा दबंग सलमान खान मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी अधिक चित्रपटात काम करणार आहे. सध्या तो त्याच्या सिकंदर चित्रपटाच्या तयारीत व्यस्थ आहे. पण सिकंदर नंतर तो कोणत्या चित्रपटात काम करणार आहे याची माहिती समोर आली आहे. सलमान लवकरच त्याच्या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल शूट करणार आहे. हा चित्रपट म्हणजे 'किक २'. सध्या सलमान दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास यांच्यासोबत 'सिकंदर' या चित्रपटावर काम करत आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या रिपोर्टनुसार, सिकंदर प्रदर्शित झाल्यानंतर सलमान 'किक २' ची तयारी सुरू करेल. २०१४ च्या हिट 'किक'च्या सिक्वेलची चाहते वर्षानुवर्षे वाट पाहत होते. या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत आहे. साजिद नाडियाडवालाने 'किक' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. आता 'किक २' मध्ये तो पुन्हा एकदा दिग्दर्शनाची धुरा आपल्या हाती घेताना दिसणार आहे.
'किक २' चे चित्रीकरण कधी सुरू होईल?
माहितीनुसार, जॅकलिन फर्नांडिस पहिल्या भागाप्रमाणेच किक २ मध्येही मुख्य अभिनेत्री म्हणून दिसणार आहे. चित्रपटाच्या मागील भागातील अनेक स्टार्स पुन्हा सिक्वेलमध्ये दिसणार आहेत. निर्मात्यांनी या वर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान किक २ चे शूटिंग सुरू करण्याची योजना आखली आहे. सलमान खान पुन्हा एकदा डेविलच्या भूमिकेत दिसणार आहे. सिक्वेलमध्ये अॅक्शन, स्टाइल आणि सलमानचा स्वॅग पाहायला मिळेल.
किक २ होणार २०२६ मध्ये प्रदर्शित
एवढेच नाही तर रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की सलमान खानचा किक २ हा चित्रपट २०२६ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. 'किक २' चे शूटिंग सुरू होण्यापूर्वी 'सिकंदर' चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.