Vicky Kaushal : 'छावा'च्या ट्रेलर लाँच वेळी विकी का घाबरला? रात्री १ वाजता नेमकं काय घडलं?

Vicky Kaushal Trailer Launch : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने ट्रेलर लाँच वेळी त्याच्यासोबत काय घडले आणि त्याच्या कुटुंबाची ट्रेलर पाहून काय प्रतिक्रिया होती जाणून घेऊयात.
Vicky Kaushal Trailer Launch
Vicky KaushalSAAM TV
Published On

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल 'छावा' (chhaava ) चित्रपटामुळे चांगलचा चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर आहेत. सध्या सर्वत्र 'छावा' चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या चित्रपटाचे कलाकार 'छावा'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेले पाहायला मिळत आहे. 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि महाराणी येसूबाईंची भूमिकेत रश्मिका मंदाना पाहायला मिळणार आहेत.

'छावा' च्या ट्रेलरला आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच एका मिडिया मुलाखतीत विकीने ट्रेलर लाँच वेळी घडलेली घटना सांगितली आहे. विकीने मुलाखतीत सांगितले की, "'छावा' च्या ट्रेलर लाँच वेळी मी खूप घाबरलो होतो. चित्रपटाचा ट्रेलर रात्री १ वाजता रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटासाठी प्रत्येकाने खूप मेहनत घेतली होती. त्यामुळे मला खूप जास्त टेन्शन आले होते. टेन्शनमुळे मी ट्रेलर लाँच वेळी माझा फोन देव्हाऱ्यात ठेवला आणि प्ले बटण दाबले. त्या क्षणी मी सर्व देवावर सोपवले होते. "

विकी कौशलने मुलाखतीत सांगितले की, "'छावा'चा ट्रेलर पाहून आईच्या डोळ्यात अश्रू आले होते. तर बाबा आणि कतरिनाला ट्रेलर खूप जास्त आवडला." 'छावा' चित्रपटाच्या दमदार ट्रेलरनेच प्रेक्षकांच्या मनात चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता वाढवली होती. मीडिया रिपोर्टनुसार, 'छावा' चित्रपट जवळपास तब्बल 130 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. 'छावा' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे.

'छावा' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने कडून U/A प्रमाणपत्र दिले आहे. सेन्सॉर बोर्डाने सांगितलेल्या बदलानंतर 'छावा' चित्रपट २ तास ४१ मिनिटे ५० सेकंदाचा झाला आहे. चित्रपटात औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. 'छावा' चित्रपटात अनेक मराठी कलाकार पाहायला मिळणार आहेत. 'छावा' चित्रपटात 'रायाजी' च्या भूमिकेत मराठी अभिनेता संतोष जुवेकर पाहायला मिळत आहे.

Vicky Kaushal Trailer Launch
Salman Khan : 'तुरुंगात असताना झोप...' भाईजानने केला कटू आठवणींचा खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com