Chhaava Movie Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chhaava: 'छावा'च्या ट्रेलरवरून पुणेकर नाराज; मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलनाचा इशारा!

Chhaava Movie: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही प्रसंगावरून पुण्यातील शिवप्रेमी नाराज झाले आहेत.

Shruti Vilas Kadam

Chhaava: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतीक्षित 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. 'छावा' या चित्रपटाचे लक्ष्मण उत्तेकर यांनी दिग्दर्शन केले असून या चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका हे प्रमुख भूमिकेत आहेत. मात्र चित्रपटातील ट्रेलरमधील काही प्रसंगावरून पुण्यातील शिवप्रेमी नाराज झाले असून मराठा क्रांती मोर्चातर्फे आज पुण्यात आंदोलन कार्यांचा इशारा देण्यात आला आहे.

'छावा' या चित्रपटात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर, रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. एकीकडे या चित्रपटाच्या ट्रेलरचे भरभरून कौतुक होत आहे. पण पुण्यात या चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराज व येसूबाई यांच्या बद्दल आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आला असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचेने केला आहे.

'छावा' या चित्रपटात दाखवण्यात आलेले छत्रपती संभाजी महाराज व येसूबाई यांचे नाचतानाचे दोन प्रसंग हे आक्षेपार्ह असल्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्वरित हे दोन्ही प्रसंग चित्रपटातून वगळावे असे मराठा मोर्चेच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे. यासाठी आज सकाळी १० वाजता लाल महाल येथे चित्रपटाचा निषेध केला जाणार आहे.

विकी कौशल, अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'छावा' हा चित्रपट पुढील महिन्यात व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने म्हणजेच १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना आता हा चित्रपट किती आवडतो हे पाहणे रंजक ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

SCROLL FOR NEXT