Chhaava Trailer: 'स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा'; विकी कौशलच्या 'छावा' आला, ट्रेलर बघून अंगावर काटा येईल!

Chhaava Movie Trailer: विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्या 'छावा' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आज प्रदर्शित झाला. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे.
Chhaava Movie Trailer
Chhaava Movie TrailerSaam Tv
Published On

Chhaava Trailer:  छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 'छावा' लवकरच प्रदर्शित होणार आहे. लक्ष्मण उतेकर दिगदर्शित 'छावा' या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. तर रश्मिका मंदान्ना त्यांच्या पत्नी महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. त्याशिवाय, अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या टीझरनंतर प्रेक्षक चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. आज 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

छावा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट या वर्षातील सर्वात प्रलंबीत ऐतिहासिक नाट्यापैकी एक आहे. हा चित्रपट लेखक शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. 'छवा'च्या ट्रेलरमध्ये विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत पूर्णपणे हरवलेला दिसतो. दमदार अ‍ॅक्शन आणि संवादांमुळे त्याचे पात्र आणखी रुबाबदार दिसून येते.

Chhaava Movie Trailer
Saif Ali khan: आईच्या उपचारासाठी त्यानं सैफवर हल्ला केला; श्रीमंत लोकांना लुटण्याचा रचत होता कट

तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नाचा लूक एका क्रूर शासकासारखा दिसतो. अक्षय खन्नाने आजपर्यंत जे काही पात्र साकारले आहेत, ते पूर्णपणे वेगळे आहे आणि त्याला शोभते, पण या भूमिकेत त्याला अक्षय खन्ना ओळखणे कठीण आहे. येसूबाईच्या भूमिकेत रश्मिका मंदान्ना खूपच सुंदर दिसत आहे. एकंदरीत, 'छवा'चा ट्रेलर अ‍ॅक्शनने भरलेला युद्धाचे अनेक दृश्य दाखवण्यात आले आहेत जे पाहून अंगावर काटा येतो.

Chhaava Movie Trailer
Pushpa 2 Director house raid : पुष्पा 2 चा डायरेक्टर सुकुमारच्या घरावर 'इन्कम टॅक्स'ची धाड; 'साउथ'चे अनेक सुपरस्टार रडारवर

विकी कौशल, अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'छावा' हा चित्रपट पुढील महिन्यात व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने म्हणजेच १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना आता हा चित्रपट किती आवडतो हे पाहणे रंजक ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com