Chhaava Movie BTS SaamTV
मनोरंजन बातम्या

Chhaava BTS: 'सिंहासनाधीश्वर शिवपुत्र...'; 'छावा' चित्रपटाची सुरुवात संभाजी महाराजांच्या सिंहगर्जनेनं, व्हिडीओ तुफान व्हायरल

Chhaava Movie BTS: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला असून १७ दिवसझाले तरी या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळत आहेत.

Shruti Kadam

Chhaava BTS: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला असून १७ दिवसझाले तरी या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळत आहेत. चाहते हा चित्रपट एकदा पाहून झाल्यानंतर पुन्हा एकदा पाहण्याचा विचार करत आहेत. आता विकीने या चित्रपटाच्या शूटींगमधील एक व्हडिओ शेअर केले आहे. यामध्ये एक मावळा गारद म्हणजेच संभाजी महाराजांसाठी सिंहगर्जना देताना दिसत आहे.

विकी कौशलने सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होता आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटातील सेट दिसत आहे. जिथे विकी संभाजी महाराजांच्या भूमिकेत सिंहासनावर विराजमान झालेला आहे. तर त्याचासमोर बाळा पाटील नावाचा एक मावळा उभा राहून संभाजी महाराजांसाठी सिंहगर्जना सादर करत आहे.

या व्हिडीओमध्ये हा मावळा सिंहासनाधीश्वर शिवपुत्र श्री श्री संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जगदंब जगदंब अशी गारद सादर करतो आणि नंतर संभाजी महाराजांच्या सिंहासनासमोर नतमस्तक होतो. हा व्हिडिओ पाहताना अंगावर शहारा येतो.छावा चित्रपटाची सुरुवात दररोज याच गारदने होत असे विकीने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

छावा बद्दल

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या मराठी कादंबरीचे सिनेमॅटिक रूपांतर आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे, तर रश्मिका मंदान्ना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. तसेच अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिका साकारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT