Chhaava Movie Box Office Collection  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chhaava Collection: होळीला छावाने फोडली डरकाळी, 'किंग खान'चा रेकॉर्ड मोडणार विकी कौशल

Vicky Kaushal Chhaava Movie: विकी कौशलचा छावा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर जादू करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत साडेपाचशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट शाहरुख खानच्या 'जवान'चा रेकॉर्ड मोडणार आहे.

Priya More

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'छावा' चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. 'छावा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक रेकॉर्ड मोडत बक्कळ कमाई करत आहे. 'छावा' चित्रपटाने होळीच्या दिवशी बक्कळ कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटामुळे लवकरच विक्की कौशल 'किंग खान' अर्थात शाहरुख खानचा रेकॉर्ड मोडणार आहे.

होळीच्या वेळी बॉलिवूडच्या एकाही मोठ्या स्टारचा चित्रपट रिलीज झाला नाही. याचा फायदा विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाला झाला. गेल्या अनेक दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर जादू करणाऱ्या छावाला होळीचा पुरेपूर फायदा झाला. होळीच्या दिवशी देखील छावाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. होळी गुरूवारी होती आणि धुलीवंदन शुक्रवारी होते. गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी 'छावा'च्या कमाईमध्ये ६१ टक्क्यांपेक्षा जास्त वाढली.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटाचे बजेट १३० कोटी रुपये इतके आहे. तर भारतीय बॉक्स ऑफिसवर ३१ दिवसांत या चित्रपटाने ५६२.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. होळीच्या सुट्टीचा 'छावा' ला खूप फायदा झाला. शुक्रवारी, थिएटरमध्ये सरासरी २८.३५ जागा भरल्या गेल्या. संध्याकाळच्या शोसाठी ४० टक्के थिएटर भरलेले होते.

बॉक्स ऑफिसवर 'छावा' चित्रपट दररोज नवा रेकॉर्ड करत आहे. छावा चित्रपटाने आतापर्यंत राजकुमार रावच्या 'स्त्री २', आमिर खानच्या 'दंगल', शाहरुख खानच्या 'पठाण', सनी देओलच्या 'गदर २' आणि शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. शाहरुख खानच्या जवान चित्रपटाने ५८२ कोटी रुपयांची कमाई केली. 'जवान' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्याच्या दिशेने छावाची वाटचाल सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT