Suraj Meher Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suraj Meher: अभिनेता सूरज मेहर याचा साखरपुड्याच्या दिवशीच अपघाती मृत्यू

Actor Suraj Meher Died: चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील सूरज मेहर या अभिनेत्याचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chattisgrah Actor Suraj Meher Died In Car accident On His Engagement Day:

चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील सूरज मेहर या अभिनेत्याचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरज हा चित्रपटाचे शूटिंग संपवून घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. रायपूरमध्ये कार आणि ट्र्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्याला आपला जीव गमवावा लागला. धक्कादायक म्हणजे सूरजच्या साखरपूडच्याच दिवशी ही घटना घडली आहे. (Latest Entertainment News In Marathi)

मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी ५ वाजता हा अपघात झाला आहे. सूरज आखरी फैसला या चित्रपटाच्या शुटिंगवरुन परतत असताना त्याच्या कारचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यातच त्याचे दुःखद निधन झाले. बिलासपूरमधील सरसिवा परिसरात ही घटना घडली आहे. अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले.

सूरज हा ४० वर्षांचा होता. त्याला नारद मेहर म्हणूनही ओळखले जात होते. सूरज मेहर त्याच्या खलनायक भूमिकांसाठी ओळखला जायचा. त्याने अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. सूरज मेहरचा साखरपुडा बुधवारी ओडिशामध्ये होणार होता. परंतु त्याआधीच त्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

SCROLL FOR NEXT