Bharat Ganeshpure
Bharat Ganeshpure Saamtv
मनोरंजन बातम्या

Bharat Ganeshpure Mother Died: 'चला हवा येवू द्या' फेम अभिनेते भारत गणेशपुरे यांना मातृशोक; कुटूंबियांनी घेतला 'हा' कौतुकास्पद निर्णय

Gangappa Pujari

Amravati: मराठी सिनेसृष्टीतून सध्या एक दुखःद बातमी समोर येत असून आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवणारे भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) यांच्या आईचे दुखःद निधन झाले आहे. भारत आणि मनिष गणेशपुरे यांच्या आई श्रीमती. मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे यांचे निधन झाले आहे. आज ०९ मार्च २०२३ रोजी पहाटे वृद्धापकाळाने त्यांचे अमरावती याठिकाणी निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. मनीष यांच्या राहत्या घरातून रहाटगाव स्मशानभूमीकरता संध्याकाळी ५ च्या सुमारास अंत्ययात्रा निघणार आहे. (Latest Marathi News)

'चला हवा येवू द्या' (Chala Hawa Yeu Dya) फेम भारत गणेशपुरे हे मुळचे अमरावती जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या मातोश्री मनोरमाबाई गणेशपुरे यांनी भारत गणेशपुरे यांचे बंधू मनीष यांच्‍या रहाटगाव येथील राहत्या घरी अखेरचा श्‍वास घेतला. आईच्‍या निधनाचे वृत्‍त कळताच भारत गणेशपुरे हे मुंबई‍हून अमरावतीकडे निघाले आहेत. मनोरमबाई यांच्या पश्चात भारत आणि मनीष ही दोन मुलं, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान, गणेशपुरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उदात्‍त हेतूने गणेशपुरे कुटुंबीयांनी त्यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. दिशा इंटरनॅशल आय बँकेच्‍या टीमने नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Shendge News | सुप्रिया सुळे आणि विशाल पाटील वंचित कसे? शेंडगेंचा संतप्त सवाल

Today's Marathi News Live : दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील संघर्ष वाढणार?

Weight Loss Drinks : उन्हाळ्यात सकाळी उठल्याबरोबर 'हे' पेय प्या; ७ दिवसांत पोटावरील चरबी कमी होईल

Ujjwal Nikam Meet Raj Thackeray : उज्ज्वल निकम यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेणार? शिवतीर्थावर चर्चा सुरू

CSK vs PBKS: चेन्नईच्या पराभवाचं नेमकं कारण काय? ऋतुराज गायकवाडने केला खुलासा

SCROLL FOR NEXT