Caught Out Trailer Out  Saam Tv
मनोरंजन बातम्या

१९९० मधल्या मॅच फिक्सिंगमागचं रहस्य बाहेर पडणार, ‘Caught Out’ चा थरारक ट्रेलर रिलीज

भारतात आतापर्यंत अनेक क्रिकेटर्सचे बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आले. क्रिकेटचं आणि चाहत्यांचे नाते फार वेगळे आहे.

Chetan Bodke

Caught Out Trailer Out: भारतात आतापर्यंत अनेक क्रिकेटर्सचे बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आले. क्रिकेटचं आणि चाहत्यांचे नाते फार वेगळे आहे. चित्रपटाच्या माध्यमातून आलेली गोष्ट प्रेक्षकांना अधिकच भावते. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला क्रिकेटमधील काही गोष्टींवरील एक माहितीपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘कॉट आऊट’ या माहितीपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनेक गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी मदत होईल.

क्रिकेट सर्वांच्याच आवडतीचा विषय. यामध्ये सर्वाधिक अवैध गोष्टींचे प्रमाण वाढले आहेत. क्रिकेट विश्वामध्ये सर्वात जास्त चर्चिला जाणारा विषय म्हणजे मॅच फिक्सिंग. बरेच खेळाडू यामध्ये अडकले, काही त्यातून बाहेर पडले तर काहींची कारकीर्दच यामुळे संपुष्टात आली. या गोष्टींचा फटका बऱ्याच खेळाडूंना बसला.

याच मॅच फिक्सिंगवर भाष्य करण्यासाठी लवकरच एक डॉक्युमेंट्री प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कॉट आऊट’ या नव्या डॉक्युमेंट्रीचं ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला असून यामध्ये ९० च्या दशकातील मॅच फिक्सिंगवर भाष्य करण्यात आले आहे. या डॉक्युमेंट्रीत आपल्याला आजवरच्या सर्वात मोठ्या मॅच फिक्सिंग स्कॅन्डलबद्दल माहिती मिळणार असल्याचं ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे.

चित्रपटाचा ट्रेलर खूपच दमदार दिसत आहे. ट्रेलरमध्ये मॅच फिक्सिंगचे कनेक्शन थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत जोडले असल्याचे दाखवले आहे. सोबतच, ट्रेलरमध्ये पुढे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने फिक्स होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या घोषणेनंतर क्रिकेट जगतातील सर्वांचेच धाबे दणाणले आहे.

युजर्स कमेंट करत म्हणतात की, भारतासाठी खेळणे हा मोठा सन्मान आहे आणि तो सन्मान विकणे लाजिरवाणे आहे. तर आणखी युजर्स म्हणतात, देशात कोणताही कायदा केला तरी मॅच फिक्सिंग कधीच थांबणार नाही. तर आणखी एक युजर म्हणतो, माहितीपटाचा आशय चांगला असून आम्ही या माहितीपटासाठी फारच उत्सुक आहोत.

ट्रेलरमध्ये अद्याप कोणत्याही खेळाडूचे नाव घेण्यात आले नसून या माहितीपटात मॅच फिक्सिंग मधील अनेक गोष्टींचा उलगडा होणार असल्याचे ट्रेलरमध्ये दिसत आहे. सुप्रिया सोबती यांनी या डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शन केलं आहे तर मेघा माथुर यांनी या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ही डॉक्युमेंट्री १७ मार्चपासून Netflix या ओटीटी प्लेटफॉर्मवर पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT