Fighter Film Advance Booking Saam Tv
मनोरंजन बातम्या

Fighter Film Advance Booking: दीपिका- हृतिकच्या 'फायटर'ने रिलीजआधीच केली छप्परफाड कमाई; फक्त तीन दिवसांत कमावले इतके कोटी

Chetan Bodke

Fighter Film Advance Booking

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर' (Fighter) चित्रपट येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. सध्या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर चित्रपटाने रिलीजच्या आधीच लाखो तिकीटांची विक्री करत कोट्यवधींचा टप्पा गाठला आहे.

चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला २० जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांना हा मोस्ट अवेटेड चित्रपट 2D, 3D, IMAX 3D आणि 4DX 3D या पद्धतीने पाहायला मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. प्रजासत्ताक दिन आणि त्यानंतर विकेंडलाही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, 'फायटर'चे संपूर्ण देशभरामध्ये ८६९९ शो आहेत. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात होताच तीन दिवसांत 'फायटर' चित्रपटाने संपूर्ण देशामध्ये १ लाख १४ हजार ३२७ तिकिटांची विक्री केली आहे. चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यंत ३.७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 'फायटर' या चित्रपटाची निर्मिती २५० कोटी रुपयांमध्ये करण्यात आली आहे. रिलीजआधीच चित्रपटाने १० ते २० कोटींची कमाई केली आहे. हा ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. दीपिका पदुकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूरच्या 'पद्मावत' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये २४ कोटींची कमा केली होती.

काही ट्रेड ॲनालिस्टच्या मते, 'फायटर' चित्रपट 'पद्मावत' चित्रपट रेकॉर्ड ब्रेक करू शकतो. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर २५ जानेवारीला चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटात हृतिक रोशनसोबत दीपिका पदुकोण, अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यासोबतच ऋषभ साहनी, अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोवर, आकर्ष अलग आणि संजीदा शेख ही स्टारकास्ट सुद्धा चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. फायटरचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले असून वायकॉम 18 स्टुडिओच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Screening Device : आता एका मिनिटात होणार कॅन्सरचं निदान, IIT कानपूरने बनवलं एक खास डिव्हाईस

Arbaz-Nikki : तुझं बाहेर लफडं असेल, अरबाजला भेटताच निक्की काय म्हणाली? VIDEO होतोय व्हायरल

Make Soap at Home : तांदळाच्या पिठापासून घरच्याघरी बनवा अंघोळीचा साबण; स्किन ग्लो करेल आणि चमकू लागेल

Marathi News Live Updates : रेल्वेच्या MPT मशीन एकमेकांना धडकल्या; चार कर्मचारी जखमी

Rock Salt Uses: उपवासाच्या दिवशी सैंधव मीठाचा वापर का केला जातो?

SCROLL FOR NEXT