तेजा सज्जाच्या (Tejas Sajja) 'हनुमान' (Hanuman Film) चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. चित्रपट रिलीज होऊन ११ दिवस झाले असून चित्रपटाला भारतामध्ये जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटाने ११ दिवसामध्ये १३९.५५ कोटींची कमाई केली आहे. (Tollywood)
राम मंदिर प्रतिष्ठापणेच्या दिवशी म्हणजेच ११ व्या दिवशी चित्रपटाने ७. ५० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला दोन्हीही विकेंडला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे. सॅकल्निकच्या अहवालानुसार, ११ व्या दिवशी चित्रपटाने ७. ५० कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेमध्ये रिलीज झाला आहे. अंजनदारी या काल्पनिक गावावर आधारित चित्रपटाचे कथानक आहे. (Bollywood Film)
'हनुमान' चित्रपट १२ जानेवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने ८.५ कोटी, दुसऱ्या दिवशी १२.४५ कोटी, तिसऱ्या दिवशी १६ कोटी, चौथ्या दिवशी १५.२ कोटी, पाचव्या दिवशी १३.११ कोटी, सहाव्या दिवशी ११.३४ कोटी, सातव्या दिवशी ९.५ कोटी, आठव्या दिवशी १०.५ कोटी, नवव्या दिवशी १४.६ कोटी, दहाव्या दिवशी १६.५० कोटींची कमाई तर अकराव्या दिवशी ७.५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने भारतात १३९.५५ तर जगभरामध्ये चित्रपटाने २०० कोटींची कमाई केली आहे. (Marathi News)
चित्रपटाबद्दल सांगायचे तर, प्रशांत वर्मा दिग्दर्शित 'हनुमान' चित्रपट १२ जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट अवघ्या २० कोटींमध्ये निर्मित झाला आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत तेजा सज्जा सह अमृता अय्यर, वरलक्ष्मी शरतकुमार, विनय राय, राज दीपक शेट्टी, वेन्नेला किशोर अशी स्टारकास्ट आहे. तर चित्रपटाची निर्मिती एस. निरंजन रेड्डी आणि के निरंजन रेड्डी आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.