स्वराज्याच्या तिनही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर पोरक्या झालेल्या मराठा साम्राज्याला आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून आपल्या कर्तुत्वाने आधार देणाऱ्या रणमर्दिनी, रणरागिनी महाराणी ताराबाई राजाराम भोसले म्हणजे स्त्रीनेतृत्वाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची गाथा सांगणाऱ्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. (Marathi Film)
अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधत यावेळी चित्रपटाचा पोस्टर अनावरण करण्यात आले. त्यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली. हा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित चित्रपट येत्या २२ मार्च २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टर अनावरण सोहळ्याला सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी, चित्रपटाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर व दिग्दर्शक राहुल जाधव उपस्थित होते. या मंगल समयी कलाकारांच्या हस्ते धार्मिक विधीने श्रीराम पूजा आणि हवनही करण्यात आले. (Ram Mandir)
चित्रपटाच्या पोस्टर लाँचिंग सोहळ्याबद्दल निर्माते अक्षय बर्दापूरकर सांगितले, "चित्रपटाचे पोस्टर केवळ चित्रपटाचीच ओळख करून देणारे नाही तर, या महत्वाच्या दिवसाचे अध्यात्मिक महत्वही आत्मसात करणारे आहे. 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना छत्रपती ताराराणी यांचा प्रवास अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती ताराराणी यांच्या शौर्याला मानवंदना देण्याचा प्रयत्न करीत आहे. हा गौरवशाली इतिहास आपल्या सर्वांसाठी लवकरच घेऊन येत आहोत. आमचा हा प्रयत्न इतिहास रसिकांना तसेच प्रेक्षकांना नक्की आवडेल, अशी आशा करतो." (Marathi News)
गोल्डन रेशियो फिल्म्स, किंग्जमेन प्रॉडक्शन प्रस्तुत, अक्षय विलास बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि मंत्रा व्हिजन यांच्या सहयोगाने डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या ग्रंथावर आधारित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांचे आहेत. अक्षय बर्दापूरकर, दीपा त्रासी निर्मित या चित्रपटाचे क्रिएटिव्ह वाईब, सौम्या मोहंती विळेकर, समीर अरोरा सहनिर्माते आहेत. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.