Boman Irani on 3 Idiots Sequel Saam TV
मनोरंजन बातम्या

3 Idiots Sequel: 3 इडियट्स सिक्वेल प्रकरणी बोमन इराणी सहकलाकारांवर संतापले; अखेर शर्मन जोशीने मागितली माफी

Boman Irani On 3 Idiots: करीना कपूर एक व्हिडिओ शेअर या चित्रपटाच्या सिक्वेलविषयी हिंट दिली होती.

Saam Tv

Viral Video Of Celebrity On 3 Idiots Sequel: 3 इडियट्स चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. करीना कपूर एक व्हिडिओ शेअर या चित्रपटाच्या सिक्वेलविषयी हिंट दिली होती. करीनानंतर आता जावेद जाफरी आणि मोना सिंग, चतुर (ओमी वैद्य) आणि आणि व्हायरस म्हणजेच बोमन इराणी यांनीही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या 3 इडियट्सच्या सिक्वेलबाबत सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे.

3 इडियट्समधील कलाकारांच्या प्रतिक्रियेनंतर चाहते 3 इडियट्सच्या नवीन सिक्वेलचे प्रमोशन असल्याचा अंदाज लावत आहेत. तसेच चाहतेही या कलाकारांच्या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत.

करीना कपूर खान, मोना सिंग यांच्यानंतर बोमन इराणी आणि ओमी वैद्य यांनीही थ्री इडियट्सच्या सिक्वेलच्या व्हायरल होणा-या फोटोबाबत आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. वीरू सहस्रबुद्धी 'व्हायरस' उर्फ ​​बोमन इराणी, एका गंमतीदार व्हिडिओमध्ये, राजकुमार हिरानीच्या सिक्वेलच्या अफवांवर म्हटले आहे “तू काय करत आहेस? ते आधीच लोकांना कळले आहे आणि क्लिप व्हायरल झाली आहे?

व्हायरसशिवाय तुम्ही 3 इडियट्सचा विचार कसा करू शकता? थँक गॉड करिनाने मला याबद्दल माहिती दिली. नाहीतर मला कधीच कळले नसते. हे योग्य नाही. मित्रांनो. एवढं मोठं काहीतरी शिजवलं आणि आम्हाला सांगितलंही नाही? तुझी मैत्री कुठे गेली, मला वाटले आपण मित्र आहोत. मला खात्री आहे की जावेद जाफरीला याची कल्पना नसेल.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ​​बोमन इराणी यांनी लिहिले आहे, "ते व्हायरसशिवाय 3 इडियट्सचा सिक्वेल कसा बनवू शकतात? जर व्हायरस खलनायक नसेल तर कोण असेल आणि काय होईल?? त्यांच्या या पोस्टवर शरमनने उत्तर दिले, "सॉरी व्हायरस.. म्हणजे बोमन इराणी सर, कृपया रागावू नका, मी लवकरच सविस्तर सांगेन... कृपया फोन उचल."

याशिवाय चतुर म्हणजेच अभिनेता ओमी वैद्य यानेही या संदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो सिक्वेलविषयी बोलताना दिसत आहे. त्याची बोलण्याची शैली पाहून चाहत्यांनाही हसू आवरता येणार नाही. या दोघांच्या व्हिडिओवर चाहतेही कमेंटचा भडीमार करत आहेत.

बोमन इराणीपूर्वी करीना कपूर, मोना सिंह यांनीही सिक्वेलबद्दल त्यांचे मत व्यक्त केले होते. 3 इडियट्समध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारे हे कलाकार आजही या चित्रपटातील भूमिकेसाठी चाहत्यांच्या हृदयात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nachni ladoo Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे लाडू

Maharashtra Live News Update: रत्नागिरीच्या लोटे midc मध्ये विनती ऑरगॅनिक कंपनीत भीषण स्फोट, एकाचा मृत्यू

कोण संजय राऊत? मी नाही ओळखत; आरोपांवर भडकले श्रीकांत शिंदे | VIDEO

Mumbai Pune Expressway वर अपघाताचा थरार! कंटेनरचा ब्रेक फेल झाला अन् ७-८ वाहने एकमेकांना धडकली, अपघातात महिलेचा मृत्यू

Saam Impact: हॉटेलवरील गुजराती पाट्या काढून लावल्या मराठी पाट्या; साम टीव्हीच्या दणक्यानंतर आली जाग|VIDEO

SCROLL FOR NEXT