‘दोस्त दोस्त ना रहा...’; MC Stan अब्दुलच्या मैत्रीत वादाची ठिणगी

सध्या एमसी स्टॅनचे आणि अब्दु रोझिक यांच्यातील वाद ही बरेच सुरु आहेत. त्या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.
Abdu and MC Stan
Abdu and MC Stan Instagram

MC Stan And Abdu Rozik: रॅपर एमसी स्टॅनला ‘बिग बॉस १६’चं विजेते पद मिळाल्यानंतर तो नेहमीच कोणात्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या तो भारत दौऱ्यावर आहे. त्याचे वेगवेगळ्या शहरांमध्ये कॉन्सर्ट सुरु आहेत. त्याचबरोबर सध्या एमसी स्टॅनचे आणि अब्दु रोझिक यांच्यातील वाद ही बरेच सुरु आहेत. त्या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.

Abdu and MC Stan
Lata Sabarwal: दयाबेननंतर आणखी एका टीव्ही अभिनेत्रीला झालाय घशाचा आजार...

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील भांडण बरेच सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘बिग बॉस १६’च्या घरात चांगले असलेले मित्र घरातून बाहेर येताच दोघेही एकमेकांच्या विरोधात आहेत. नुकतंच अब्दूच्या टीमने सोशल मीडियावर एक निवेदन शेअर केलं आहे. सध्या ते निवेदन सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

त्याच्या निवेदनात म्हटलं आहे, ‘दोघे नुकतेच बेंगळुरूमध्ये भेटले होते. अब्दूने स्टॅनच्या मॅनेजरशी बोलून सांगितले की त्याला स्टॅनच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी व्हायचे आहे आणि त्याला पाठिंबा द्यायचा आहे. पण स्टॅनच्या सुरक्षा पथकाने आणि आयोजकांनी त्याला सांगितले की स्टॅनला तो कार्यक्रमस्थळी नको होता. स्टॅनच्या टीमकडून ही चूक झाल्याचं अब्दूला वाटलं म्हणून मग त्याने तिकीट काढून कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न सुरू केला.’

निवेदनात पुढे म्हटले, ‘मात्र यानंतर स्टॅनच्या व्यवस्थापकाने अब्दूला शिवीगाळ करत एन्ट्री गेटवरूनच परत केलं, इतकच नाही तर त्याच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली असून फलकही फोडण्यात आल्याचं त्याने निवेदनात लिहिले आहे. आता इतक्या आरोपांनंतर सगळ्याचं लक्ष एमसी स्टॅनच्या वक्तव्याकडे लागले होते.’

Abdu and MC Stan
Suniel Shetty-Shehnaaz Gill: पॉपकॉर्नच्या वाढत्या किंमतीवर सुनीत शेट्टी स्पष्टच बोलला

‘आता त्यातच एमसी स्टॅनच्या जवळच्या एका सूत्राने हे आरोप निराधार असल्याचं म्हटले की, 'बिग बॉस संपताच स्टॅन त्याच्या संगीत टूरमध्ये व्यस्त झाला. तो एक स्वतंत्र कलाकार आहे आणि त्याने नेहमीच एकट्याने परफॉर्म केले आहे, त्यामुळे त्याला कोणाशीही सहयोग करायचा नव्हता. अब्दूचा त्याच्या बेंगळुरू कॉन्सर्टमध्ये अपमान झाल्याचा किंवा स्टॅनच्या टीमने त्याच्या कारचे फलक फोडल्याचे दावे पूर्णपणे मूर्खपणाचे आहेत. असे कोणी का करेल? हे सर्व आरोप निराधार आहेत.’ असं म्हणतं त्यांनी अब्दूने लावलेले आरोप फेटाळले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com