Esmayeel Shroff
Esmayeel Shroff Saam TV
मनोरंजन बातम्या

Esmayeel Shroff Passes away: सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचे निधन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचे निधन झाले आहे. बुधवारी रात्री उशिरा त्यांनी वयाच्या ६२ व्या अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मिळालेल्या माहितीनुसार, ते अनेक दिवसांपासून आरोग्याच्या समस्येने त्रस्त होते.

इस्माईल यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये (Bollywood) शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. फिल्ममेकर इस्माईल श्रॉफ यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये 'बुलंदी', 'थोडी सी बेवफाई', 'सूर्या' आणि 'आहिस्ता-आहिस्ता' सारखे हिट चित्रपट दिले. (Latest News)

गोविंदाला दिली ओळख

इस्माईल श्रॉफ यांनी गोविंदाला इंडस्ट्रीत ब्रेक दिला. गोविंदाचा पहिला चित्रपट लव्ह 86 हा इस्माईल श्रॉफ यांनी दिग्दर्शित केला होता. इस्माईल यांच्या निधनाने धक्का बसल्याची प्रतिक्रिया गोविंदाने दिली आहे. मी खूप दुःखी आहे, माझ्या करिअरची सुरुवात त्याच्या चित्रपटापासूनच झाली. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, त्यांनी मला फक्त कामच दिले नाही तर माझ्यावर विश्वासही ठेवला, असं गोविंदाने म्हटलं.

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात

फिल्मी दुनियेत येण्यापूर्वी त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून साऊंड इंजिनीअरिंगचा कोर्स केला. त्यानंतर चित्रपटात करिअर करण्यासाठी ते मुंबईत आले. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. साधू और शैतान या चित्रपटात त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मला स्वप्नात असल्याचा फील येतोय; नरेश मस्के

Haryana Political Crisis: हरियाणा सरकार विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत, मुख्यमंत्री सैनी बहुमत सिद्ध करणार?

Navi Mumbai News : कुर्ला स्क्रॅप मार्केटमधील गोदामाला भीषण आग; घटनास्थळी आगीचे लोळ

Bhandara News: भंडाऱ्यात भीषण अपघात, 27 मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले

IPL 2024 CSK vs RR: आयपीएलमध्ये CSKचं आव्हान कायम; प्लेऑफमधील एंट्रीसाठी राजस्थान वेटिंगवर

SCROLL FOR NEXT