Stree 2 Movie Poster Instagram
मनोरंजन बातम्या

Stree 2 Trailer Date: अखेर ठरलं... राजकुमार रावच्या 'स्त्री २'च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर

Stree 2 Movie Trailer Released Date: राजकुमार राव स्टारर आणि मोस्ट अवेटेड 'स्त्री' चित्रपटाचा सिक्वेल लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर येत्या १८ जुलैला सोशल मीडियावर रिलीज होणार आहे.

Chetan Bodke

राजकुमार राव स्टारर आणि मोस्ट अवेटेड 'स्त्री' चित्रपटाचा सिक्वेल लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिकने केले आहे. 'स्त्री' आणि 'स्त्री २'चे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. 'मुंज्या'च्या रिलीजवेळी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. त्यानंतर आता 'स्त्री २'चा ट्रेलर रिलीज होणार आहे.

गेल्या काही तासांपूर्वीच, चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. शिवाय चित्रपटाचा नवा पोस्टरही रिलीज करण्यात आला. चित्रपटाच्या स्टारकास्टने चित्रपटाचे तीन पोस्टर शेअर केलेले आहेत.

शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, एका महिलेची वेणी दिसत आहे. ती वेणी तिने पकडलेली दिसत आहे. या महिलेचा भितीदायक अंदाज सध्या सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आहे. "ओ स्त्री रक्षा करना, सरकटे का आतंक; 'स्त्री २'चा दोन दिवसांत ट्रेलर रिलीज होतोय." या भितीदायक पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर हा 18 जुलै रोजी रिलीज होणार आहे.

'स्त्री २' मध्ये प्रमुख भूमिकेत राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरसह वरुण धवन, तमन्ना भाटिया, पंकज त्रिपाठी, अपारशक्ति खुराना, विजय राज, अभिषेक बॅनर्जी, आकाश दाभाडे, फ्लोरा सैनी आणि इतर काही कलाकार दिसणार आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या 'स्त्री २'चित्रपटात अक्षय कुमार कॅमिओ करताना दिसणार आहे. 'स्त्री २' आणि अक्षय कुमारचा 'खेल-खेल' चित्रपट एकाच दिवशी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हे दोन्ही चित्रपट १५ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहेत. 'स्त्री २' चित्रपटाची निर्मिती मॅडॉक फिल्म्स आणि जिओ प्लॅटफॉर्म्स करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वीच दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

Vice president Election : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार ठरला; भाजप अध्यक्षांकडून नाव जाहीर

Accident : भीषण अपघात! कार-एसयूव्हीच्या धडकेत लागलेल्या आगीत ७ जण जिवंत जळाले

SCROLL FOR NEXT