Shreya Ghoshal  saam tv
मनोरंजन बातम्या

Shreya Ghoshal : कतरिना कैफचं 'ते' गाणं गायल्याचा श्रेया घोषालला आजही पश्चाताप, नेमकं कोणत्या कारणामुळे गायिका नाराज?

Shreya Ghoshal On Chikni Chameli Song : प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने 'चिकनी चमेली' गाण्याबद्दल मोठे विधान केले आहे. ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. श्रेया नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

श्रेया घोषालचे 'चिकनी चमेली' गाणे प्रचंड गाजले.

'चिकनी चमेली' गाण्यामुळे श्रेयाला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.

नुकतेच श्रेयाने 'चिकनी चमेली' गाण्याबद्दल मोठे विधान केले आहे.

आपल्या आवाजाने जगाला मंत्रमुग्ध करणारी बॉलिवूडची सुरेल गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) कायम आपल्या कामामुळे चर्चेत असते. आजवर तिने अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. 2012 साली रिलीज झालेल्या 'अग्निपथ' (Agneepath) चित्रपटातील 'चिकणी चमेली' (chikni chameli) हे गाणे श्रेया घोषालने गायले होते. जे आजही सुपरहिट आहे. 'चिकनी चमेली' गाण्यावर कतरिना कैफने भन्नाट डान्स केला होता. मात्र नुकतेच श्रेया घोषालने या गाण्यासंबंधित मोठे विधान केले आहे, ज्यामुळे गायिका चर्चेत आली आहे.

श्रेया घोषालने एका मुलाखतीत सांगितले की, 'चिकणी चमेली' सारखी गाणी भविष्यात रेकॉर्ड न करण्याचा ठाम निर्णय तिने घेतला आहे. श्रेयाने स्पष्ट केले आहे की, जरी तिने 'चिकणी चमेली' हे गाणे गायले असले आणि अजूनही ते संगीत कार्यक्रमांमध्ये सादर केले जाते, तरी भविष्यात अशी गाणी रेकॉर्ड न करण्याचा ठाम निर्णय तिने घेतला आहे. या गाण्यानंतर श्रेया घोषाला अनेक टीकांना आणि ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.

श्रेया घोषाल नेमकं काय म्हणाली?

श्रेयाने राज शमानीला पॉडकास्टमध्ये सांगितले की, "'चिकनी चमेली'च्या जबरदस्त यशानंतर तिला अनेक नवीन गाणी मिळाली. परंतु त्यापैकी बहुतेक गाण्यांचे बोल तिला खूप अस्वस्थ करणारे होते. त्यामुळे तिने अशी गाणी गाणे टाळले..." 'चिकनी चमेली' गाणे गायल्यावर श्रेया घोषाला ट्रोल करण्यात आले होते. तेव्हा तिची वादग्रस्त विधाने चर्चेत होती. यावर बोलताना श्रेया घोषाल म्हणाली की, "मी वादग्रस्त बोलले नव्हते...मी इतकच म्हणाले की, मी लहान मुलांसमोर हे गाणं गाऊ शकत नाही. मला नाही योग्य वाटत. 'चिकनी चमेली' या गाण्यात फार अश्लील वगैरे असे काही नव्हतं."

श्रेया घोषाल पुढे म्हणाली की, 'चिकनी चमेली' रेकॉर्ड केले तेव्हा ती प्रत्येक शब्दामागील खोल अर्थ समजून घेण्याइतकी प्रौढ नव्हती." श्रेयाचा वय आणि अनुभवानुसार ती तिच्या संगीताबद्दल अधिक काळजी घेऊ लागली आहे. तिला कळलं की, एकदा गाणे हिट झाले की, तिला ते सर्वत्र गायले पाहिजे अगदी मुलांसमोरही ज्यामुळे कधीकधी विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते.

शेवटी श्रेया घोषाल म्हणाली की, "मी ते गाणे गायले आणि मला ते आवडले... स्टेजवर गाणे सादर करण्यास मला कोणतीही लाज वाटत नाही कारण ते माझे काम आहे. पण हो, मला आता अशी गाणी रेकॉर्ड करायची नाहीत. हे एक असे गाणे आहे जे, नेहमीच माझ्यासोबत राहील, ज्यावर आज लहान मुलेही नाचतात. कधीकधी मी स्टेजवर गाताना माझे डोळे बंद करते, पण ते माझे गाणे आहे म्हणून मी ते नाकारू शकत नाही..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT