Personal Loan: लोन फेडताना या गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा भविष्यात बसू शकतो मोठा फटका

Personal Loan: लोन परतफेड करताना तुम्ही काळजी घ्यायची आहे. लोन परतफेड करताना सर्व माहितीची लेखी स्वरुपात नोंद करायची आहे. जर तुम्ही ही नोंद केली नाही तर भविष्यात खूप अडचणी येऊ शकतात.
Personal Loan
Personal LoanSaam Tv
Published On
Summary

लोन परतफेड करताना या गोष्टींची काळजी घ्या

सर्व गोष्टींची लेखी स्वरुपात नोंद असणे आवश्यक

जर भविष्यात अडचण आली तर या कागदपत्रांच्या आधारे करु शकता तक्रार

अनेकजण घर, कार किंवा वैयक्तिक कामांसाठी लोन घेतात. दर महिन्याला एक ठरावीक रक्कमेचा हप्ता भरुन तुम्हाला लोनची परतफेड करावी लागते. दरम्यान, लोनची परतफेड करताना तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची असते. तुम्हाला लोन पूर्णपणे फेडल्याची नोंद करुन घ्यायची असते. जर तुम्ही अधिकृतपणे नोंद केली नाही तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. जर तुम्ही हे काम केले नाही तर कर्जदारांकडून ईएमआय मागण्याचा अधिकार असतो. त्यामुळे ही परिस्थिती टाळण्यासाठी सर्वकाही अधिकृतपणे नोंद असायला हवे.

Personal Loan
आर्थिक अडचण आलीय? UPI दूर करणार तुमची समस्या, बँकेत न जाता मिळेल Loan

अनेकजणांच्या मते, लोन मॅनेजमेंटसाठी बेसिक कौशल्य असणे गरजेचे आहे. दरम्यान, याचसोबत तुम्ही प्रत्येक लहान मोठ्या कागदपत्रांकडे विशेष लक्ष द्याला हवे. तुम्हाला वेळोवेळी ईएमआय पेमेंट, रेग्युलर अकाउंट मॉनिटरिंग करावे लागते. अनेकदा अधिकृत रेकॉर्डमध्ये लोनची रक्कम पूर्णपणे भरली नसल्याचे दाखवले जाते. त्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी कायदेशीर पद्धतीने करायला हव्यात.

लोन फेडताना ही काळजी घ्या

तुम्हाला लोनसंबंधित सर्व कागदपत्रे जमा करायची आहेत. त्यासंबंधित ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड, बँक स्टेटमेंट, पेमेंट केल्यानंतरची लेखी माहिती द्यायची आहे. तुमच्याकडे सर्व रेकॉर्ड अपडेट असायला हवे.

कर्जासंबंधित सर्व गोष्टींचा फॉलोअप ईमेल किंवा लेटर पाठवायचे आहे. या मेलमुळे तुमची लोनची प्रोसेस सोपी होणार आहे.

Personal Loan
Canara Bank Robbery : कॅनरा बँक दरोडा प्रकरणात हादरणारा ट्विस्ट, असिस्टंट मॅनेजरनंच दीड कोटींवर हात साफ केला, धक्कादायक कारण समोर

क्रेडिटबाबतची सर्व माहिती क्रेडिट ब्युरोला दिली जाते. जर तुमची क्रेडिट माहिती चुकीची असेल तर त्याचा खूप वाईट परिणाम होईल. यामुळे जर तुमच्या प्रोफाइलवर चुकीची माहिती दिसत असेल तर त्याची क्रेडिट ब्युरोकडे तक्रार द्या. पेमेंटचा पुरावा, कागदपत्रे सबमिट करा.

जर करदात्याने तुमची तक्रार घेतली नाही किंवा समस्या सोडवली नाही तर संस्थेतील उच्च अधिकाऱ्याला माहिती द्या. अशी समस्या सोडवण्यासाठी ग्राहक संरक्षण संस्था अशी विशेष संस्था आहे. त्यांच्याकडे तक्रार करा.

Personal Loan
Loan Tips: पहिल्यांदा लोन घेत असताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com