Sakshi Sunil Jadhav
आजकाल अनेकजणांना लक्झरी लाइफ जगायला आवडतं, ब्रॅंन्डेड कपडे घालायला आवडतं. त्यामुळे लोक लोनकडे जास्त आकर्षित होतात.
काही लोकांना अचानक गरज भासते, पर्सनल लोन, होम लोन किंवा डिजिटल लोन घेण्यााचा निर्णय घेतात. मात्र त्यावेळी केलेली एक छोटी चूक भविष्यात मोठं आर्थिक नुकसान करू शकते. म्हणून मुद्दे नीट समजून घ्यावेत.
लोन घेताना काही मिनिटांत लोन अशा अनोळख्या ऑफर्सवर कधीही विश्वास ठेवू नये. अशा अॅप्स तुमचा डेटा, कॉन्टॅक्ट लिस्ट स्कॅन करून नंतर त्रास देऊ शकतात. काही तर पैसे घेऊन गायबही होतात.
कोणत्याही प्रकारचे लोन घ्यायचे असेल तर फक्त RBI रजिस्टर असलेल्या अॅप्स किंवा बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटचा वापर करा. कमी व्याज किंवा जलद अप्रुवलच्या लोभात पडू नका.
ब्रोकर गोड बोलून फसवू शकतात. ते पैसे घेऊन चुकीची माहिती देतात किंवा लोन प्रक्रियेत उशीर करतात. काही वेळा लोन मिळतच नाही. त्यामुळे थेट बँकेशीच संपर्क करा.
लोनचे कागद एकदा साइन केले की सर्व अटी मान्य झाल्या म्हणून धरल्या जातात. त्यामुळे प्रत्येक अट, व्याजदर, प्रोसेसिंग फी आणि लपविलेले चार्जेस नीट वाचा.
उच्च EMIमुळे मासिक बजेट बिघडू शकतं. EMI चुकली तर क्रेडिट स्कोर खराब होतो. EMI कॅल्क्युलेटर वापरून आपल्या परवडीतली किस्त निवडा.
काही ऑफर मर्यादित वेळासाठी आहेत असे सांगून लोकांना तत्काळ निर्णय घ्यायला भाग पाडले जाते. पण घाईत घेतलेला निर्णय नंतर त्रासदायक ठरतो. वेळ घ्या, माहिती तपासा.
लोन घेतल्यानंतर ''कसे फेडायचे?'' हा प्रश्न उद्भवू नये. मासिक बजेट, इतर खर्च, बचत आणि पुढील काही महिन्यांची परिस्थिती लक्षात घेऊन परतफेडीची प्लॅनिंग करा.