Manasvi Choudhary
थंडीत फ्लॉवरच्या भाजीचे सेवन अधिक केले जाते. फ्लॉवरच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी, खनिजे, जीवनसत्त्वे असतात.
फ्लॉवरच्या भाजीचे सुप, फ्लॉवर राईस, फ्लॉवर भजी असे विविध पदार्थ बनवले जातात.
थंडीत फ्लॉवरची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे आरोग्य देखील चांगले राहते. फ्लॉवर या भाजीमध्ये दाहक- विरोदी गुणधर्म असतात यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
फ्लॉवरमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
रक्तातील साखर कमी करण्यासाठी फ्लॉवरच्या भाजीचा आहारात समावेश करावा.
फ्लॉवरच्या भाजीमध्ये कोलीनचे प्रमाण अधिक असते यामुळे मेंदूचा विकास होते.
फ्लॉवरमध्ये फक्त २५ टक्के कॅलरीज असतात यामुळे शरीराचे वजन कमी करायचे असेल तर फ्लॉवर खाणे उत्तम आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.