Manasvi Choudhary
हिवाळ्यात सर्वत्र थंडीचे वातावरण असते अशावेळी थंडीपासून शरीराचे बचाव करण्यासाठी ब्लँकेट किंवा शालने तोंड झाकून झोपतात.
मात्र तुम्हाला माहितीये का? ब्लँकेटने तोंड झाकून झोपल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
तोंड किंवा नाक झाकून झोपल्याने हवेचा नैसर्गिक प्रवाह मर्यादित होतो यामुळे गुदमरल्यासारखे वाटू शकते.
ब्लँकेटमधील गरम हवेमुळे घाम, त्वचेवर परिणाम होतो. चेहरा झाकून झोपल्याने श्वास घ्यायला त्रास होतो. वारंवारं असे झाल्याने झोप मोड होते.
ब्लँकेटमधील हवा आणि आर्द्रता घशाला त्रासदायक ठरते यामुळे घसा खवखवणे, खोकला या समस्या उद्भवतात.
ब्लँकेट तोंडावर घेऊन झोपल्याने हॉर्ट अटॅकचा धोका वाढतो कारण यामुळे शरीराला ऑक्सिजन मिळत नाही.
ब्लँकेटमध्ये तोंड झाकून झोपल्याने शरीराच्या वजनावर परिणाम होतो तसचे यामुळे व्यक्ती जास्त वेळ झोपते ज्यामुळे शरीराचं मेटाबॉलिज्म हळू काम करते यामुळे वजन देखील वाढू शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.