Famous Singer saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Singer : "पाय पकडले अन् ..."; प्रसिद्ध बॉलिवूड गायिकेसोबत लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्याचे अश्लील वर्तन, VIDEO होतोय व्हायरल

Famous Singer Viral Video : बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिकेसोबत लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्याने गैरवर्तन केले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिकेसोबत लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्याने गैरवर्तन केले.

लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्याने गायिकेचा पाय धरला.

व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरचा (Kanika Kapoor ) मोठा चाहता वर्ग आहे. तिने आपल्या स्टाइल आणि आवाजाने तरुणाईला वेड लावले आहे. नुकताच मेघालयातील मेगाँग महोत्सवात कनिकाने आपल्या गाण्याने चारचाँद लावले. मात्र लाईव्ह कॉन्सर्टमध्ये कनिकासोबत एका चाहत्याने गैरवर्तन केले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

7 डिसेंबर रोजी मेघालयातील मेगाँग महोत्सवात गायिका कनिका कपूरने लाईव्ह परफॉर्मन्स दिला. कनिका कपूर गात असताना एका चाहत्याने स्टेजवर चढून कनिकाचे पाय पकडून तिला पकडण्याचा प्रयत्न केला. तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवढ्यात सुरक्षा रक्षक तेथे आले आणि त्या चाहत्याला बाजूला घेऊन गेले. मात्र अचानक घडलेल्या या प्रसंगाने घाबरून न जाता, कनिका कपूरने परिस्थिती शांतपणे हाताळली आणि गाणे पुढे चालू ठेवले.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गायिका कनिका कपूर 'काला चष्मा' गाताना दिसत आहे. अचानक प्रेक्षकांमधील एका चाहत्याने स्टेजवर उडी मारली आणि तिचे पाय धरले. कनिकाने लगेच त्याला ढकलून दिले. त्यानंतर, कनिकाचे सह-कलाकार आणि बाउन्सर चाहत्याला स्टेजवरून बाहेर काढले. कनिका कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कनिका कपूरसोबत घडलेला हा प्रकार पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. त्यांनी कनिका कपूरच्या सुरक्षिततेवर प्रश्न चिन्हा निर्माण केले. तर महिलांच्या सुरक्षेवर बोलताना नेटकरी दिसले. एका युजरने लिहिलं की, "इतक्या लोकांसमोर स्टेजवरही महिला सुरक्षित नाहीत..." तसेच त्या मुलाला किंवा चाहत्याला चांगली शिक्षा द्यावी असे देखील बोले जात आहे.

कनिका कपूरने आजवर अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. यात 'चिट्टियां कलाइयां', 'लव्ह लेटर', 'बेबी डॉल' 'जुगनी जी', 'कमली', 'बीट पे बूटी' यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अहिल्यानगर मनपा निवडणुकीत अजित पवार गटाच्या कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड...

Marathi Serial Off Air : नवीन वर्षाच्या सुरुवातीला लोकप्रिय मालिकेने घेतला निरोप, एका वर्षातच गाशा गुंडाळला

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत ठाकरे गटाच्या उपनेत्याचा राजीनामा, पक्षात खळबळ|VIDEO

Beed Crime: २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, ऊस तोडणीसाठी करताना भयंकर घडलं; बीड हादरले

Ladki Bahin Yojana: नोव्हेंबरचे ₹१५०० जमा; लाडकीला डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा

SCROLL FOR NEXT