Bihar Election: लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची अलीनगरमधून दमदार आघाडी|VIDEO

Maithili Thakur Takes Early Lead From Alinagar: अलीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार आणि लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर सुरुवातीपासून आघाडीवर आहे. बिहार निवडणुकीत सेलिब्रिटी उमेदवारांमध्ये तिची कामगिरी विशेष ठरत आहे.

देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार निवडणुकीच्या निकालाचा निकाल जवळपास स्पष्ट होत चालला आहे. यावेळी बिहारमध्ये कोणाचे सरकार स्थापन होणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्कंठा लागली आहे. या निवडणुकीत भोजपुरी स्टार्सही निवडणूक रणांगणात उतरले आहे. खेसारी लाल यादव, रितेश पांडे, मैथिली ठाकूर आणि पवन सिंह यांची पत्नी ज्योति सिंह यांसारखे सेलिब्रिटी यावेळी वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.

लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर तिच्या लोकगीतांसाठी ओळखली जाते आणि बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात तिचा चाहता वर्ग आहे. भाजपने मैथिली ठाकूरला अलिनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. आजच्या निवडणुकीच्या निकालामध्ये सुरुवातीपासून आघाडीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com