Ye Jawani Hai Deewani Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ye Jawani Hai Deewani Movie: दीपिका- रणबीर पुन्हा एकदा करणार रोमान्स; 'या' चित्रपटाचा सिक्वेल येणार

Ye Jawani Hai Deewani Sequel: रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण हे चित्रपटातील ऑनस्क्रिन हॉट कपलपैंकी एक आहेत. या दोघांची केमेस्ट्री साऱ्यांनाच वेड लावते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ranbeer And Deepika Latest News: रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण हे चित्रपटातील ऑनस्क्रिन हॉट कपलपैंकी एक आहेत. या दोघांची केमेस्ट्री साऱ्यांनाच वेड लावते. रणबीर आणि दीपिका अभिनीत 'ये जवानी है दिवानी' हा चित्रपट आजही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. रणबीर कपूर, दीपिका पादुकोणची चित्रपटातील केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला. चाहते पुन्हा एकदा या दोघांच्या केमेस्ट्रीची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच रणबीरने चाहत्यांना सुख:द धक्का दिला आहे.

रणबीर कपूर आणि दीपिका पुन्हा पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत. ही जोडी २०१३ मध्ये आलेल्या अयान मुखर्जी यांच्या ' ये जवानी है दिवानी' या चित्रपटात झळकली होती. चित्रपटातील रणबीरच्या बनी तर, दीपिकाच्या नैना या भूमिकेने प्रेक्षकांची मनें जिंकली. आता दोघेही या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहेत. नुकतेच रणबीरने चित्रपटाच्या सीक्वेलबद्दल त्याचे मत व्यक्त केले आहे. (Latest Entertainment News)

रणबीरने एका मुलाखतीत अयान मुखर्जीकडे सीक्वलसाठी एक उत्तम कथानक असल्याचे सांगितले आहे. पुढे रणबीरने, ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाचा उत्तम सीक्वल बनेल. मला अजूनही चांगलंच आठवतंय की यासाठी अयानच्या डोक्यात एक छान कथा देखील होती पण त्यावेळी आम्ही ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होतो. मात्र लवकरच अयान ह्या सिक्वेलवर काम करेल, मलाही पुन्हा एकदा बनीची व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर साकारता येणार असल्यामुळे खूप आनंद झाला आहे. आता १० वर्षांनी नैना, बनी आणि अवी याच्या आयुष्यात नेमके काय बदल घडलेले आहेत? हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

रणबीर आणि दीपिकाच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते, बॉक्स ऑफिसवरही चित्रपट सुपरहिट ठरला होता. चित्रपटाने रेकॉर्डब्रेक करत केवळ भारतातच २३६ कोटींहून अधिक कमाई केली होती. तर चित्रपटाने जगभरात ३०० कोटींच्या आसपास कमाई केली होती. आता या चित्रपटाचा सिक्वेल ही येणार असल्याचं बोललं जात आहे मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'अॅनिमल' चित्रपटात व्यस्त आहे. रणबीरचा हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे.रणबीरचा ‘तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली.

First car service: नवी कार घेतल्यानंतर पहिली सर्व्हिसिंग कधी केली पाहिजे?

'70 पैकी 35 टक्केच जंगल शिल्लक' कर्जतमधील वृक्षतोडीवर सयाजी शिंदे संतापले|VIDEO

Sweet Bor Recipe : दिवाळीचा फराळ होईल खास! बनवा कोकण स्पेशल खुसखुशीत गोड बोरं, खूपच सोपी आहे रेसिपी

Maharashtra News Live Update: भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाईवर आढावा बैठक सुरू

WhatsApp Tips : स्मार्टफोन चोरीला गेलाय? प्रायव्हेट चॅट्स लीक होण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठा अनर्थ

SCROLL FOR NEXT