'70 पैकी 35 टक्केच जंगल शिल्लक' कर्जतमधील वृक्षतोडीवर सयाजी शिंदे संतापले|VIDEO

Sayaji Shinde Opposes Tree Cutting: कर्जत-भीमाशंकर परिसरात टोरंट पॉवर प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीला अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी विरोध दर्शवला आहे.

कर्जत-भीमाशंकर परिसरात टोरंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल होणार असल्याच्या मुद्द्यावरून पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आता अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनीही या वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. निसर्ग आणि जंगल संवर्धनासाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या सयाजी शिंदे यांनी या मुद्यावरून राज्यकर्त्यांना जाब विचारला आहे. एकेकाळी परिसरात मोठ्या प्रमाणात असलेले जंगल आता कमी होत चालल्याचा मुद्दा सयाजी शिंदे यांनी उपस्थित केला आहे. जंगलक्षेत्र कमी होत असताना विकासाच्या नावाखाली आणखी वृक्षतोड का केली जात आहे, असा सवाल या मुद्यावरून उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com