Namrata Sambherao Son Rudraj: ‘एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई...’, चिमुकल्याचं गाणं ऐकून नम्रता भावुक

सोशल मीडियावर लाडक्या लेकाचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडिओत तिचा मुलगा रुद्राज दिसतोय. त्या व्हिडीओत, रुद्राजने एक खास गाणं गाताना दिसत असून, ते गाणं ऐकून नम्रता व्याकूळ झाली.
Namrata Sambherao Son Rudraj
Namrata Sambherao Son RudrajInstagram

Namrata Sambherao Son Rudraj: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेराव सध्या कुर्रर्रर्र नाटकाच्या प्रयोगानिमित्त परदेश दौऱ्यावर आहे. सध्या ती नाटकानिमित्त परदेश दौऱ्यावर असलेली नम्रता मुलाच्या आठवणीत व्याकुळ झाली आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर लाडक्या लेकाचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडिओत तिचा मुलगा रुद्राज दिसतोय. त्या व्हिडीओत, रुद्राजने एक खास गाणं गाताना दिसत असून, ते गाणं ऐकून नम्रता व्याकूळ झाली.

Namrata Sambherao Son Rudraj
Guru Thakur Won Best Lyricist Award: 'मालिका नाटक चित्रपट' लेखक संघटनेचा ८ वा वर्धापनदिन सोहळा संपन्न: गंगाराम गवाणकर यांना ‘लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार’ प्रदान

व्हिडीओ पोस्ट करत “एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई.. म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही.. हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा डोळे पाणवतात लवकरच परत येतेय कधी एकदा तुला घट्ट मिठी मारतेय असं झालंय कारण मी खरंच शूर नाही हे मी इतकं लांब आल्यावर माझ्या लक्षात आलंय कारण क्षणोक्षणी तुझी आठवण आली पण आता मला खात्री आहे माझा सगळा भित्रेपणा छूमंतर होणार कारण लवकरच मी माझ्या शूर बाळाला भेटणार आहे.” लाडक्या रुद्राजची पोस्ट शेअर करताना नम्रता भावूक झाली आहे. (Marathi Actress)

नम्रता जरी परदेशात नाटकानिमित्त असली तरी तिचं अर्ध लक्ष तिच्या मुलांकडे आहे. मुलगा काय करतो?, त्याची तब्येत कशी आहे आणि अनेक प्रश्न तिच्या मनात घर करून तयार आहेत. नम्रताने शेअर केलेल्या व्हिडीओत, मुलगा रूद्राज आपल्या लाडक्या आईसाठी “एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई.. म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही...” हे गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून ज्या मुलांनी घर सोडले आहे, त्यांच्या आईचे डोळे नक्कीच पाणावतील. (Entertainment News)

Namrata Sambherao Son Rudraj
Man Dhaga Dhaga Jodte Nava Serial: मुलगी जन्मापासून बेघर असते का? अभिनेत्री दिव्या पुगावकर तमाम आई-वडिलांना सवाल

सध्यो सोनी मराठी वाहिनीवर टेलिकास्ट होणाऱ्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे 'नम्रता संभेराव'. या मालिकेत तिने आतापर्यंत कधी 'लॉली' तर कधी 'आई' असो किंवा नुकतेच सर्वांसमोर आलेले 'पावली' हे पात्र असो. तिच्या प्रत्येक भूमिकेनं अवघ्या महाराष्ट्राला पोट धरून हसवलं आहे. (Marathi Film)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com