Shreya Maskar
दिवाळी म्हटलं की घराघरांत फराळाची लगबग सुरू होते. चकली, चिवडा, करंजी, लाडू यांसोबत आणि एक पदार्थ अनेकांच्या घरात दिवाळीला बनवा जातो, तो म्हणजे कोकण स्पेशल गोड बोरं
गोड बोरं बनवण्यासाठी गव्हाचे पीठ किंवा मैदा, बारीक रवा , साखर, वेलची पूड , चिमूटभर मीठ, तूप, पाणी आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
गोड बोरं बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ किंवा मैदा, रवा, तूप आणि चिमूटभर मीठ घाला. थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या.
पिठाचे छोटे गोळे करून त्यांना बोरासारखा गोल आकार द्या. पॅनमध्ये तेल गरम करा. मंद ते मध्यम आचेवर गोळे सोनेरी होईपर्यंत तळा.
दुसऱ्या भांड्यात साखर आणि थोडे पाणी घालून पाक तयार करा. त्यात वेलची पूड मिसळा. साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठरवा.
तळलेले गोळे पाकात घालून हलक्या हाताने एकत्र करा, जेणेकरून त्यांना गोडसर आवरण मिळेल. गोळे ताटात काढून थंड होऊ द्या. त्यानंतर हवाबंद डब्यात ठेवा.
गोळे तळताना आच खूप मोठी ठेवू नका. पाक जास्त पातळ असल्यास गोळ्यांवर साखरेचे आवरण नीट बसणार नाही.
लाडू, नानकटाई, बिस्किट, चकली, शंकरपाळी, करंजी, अनारसे, चिवडा, शेव, चिरोटे